esakal | बिहार रणसंग्राम : दुसऱ्या टप्प्यातही कलंकितांची चलती
sakal

बोलून बातमी शोधा

Bihar-Election

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातही संयुक्त जनता दल- भाजपसह राजद, कॉंग्रेस, या सर्वच मुख्य पक्षांनी गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांना मुक्तहस्ते तिकीटवाटप केले आहे. लोकशाही प्रक्रियेतील सुधारणांबाबत काम करणाऱ्या एडीआर संस्थेच्या माहितीनुसार दुसऱ्या टप्प्यातील १४६३ उमेदवारांपैकी ३४ टक्के उमेदवारांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

बिहार रणसंग्राम : दुसऱ्या टप्प्यातही कलंकितांची चलती

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातही संयुक्त जनता दल- भाजपसह राजद, कॉंग्रेस, या सर्वच मुख्य पक्षांनी गुन्हेगारी पार्श्‍वभूमीच्या उमेदवारांना मुक्तहस्ते तिकीटवाटप केले आहे. लोकशाही प्रक्रियेतील सुधारणांबाबत काम करणाऱ्या एडीआर संस्थेच्या माहितीनुसार दुसऱ्या टप्प्यातील १४६३ उमेदवारांपैकी ३४ टक्के उमेदवारांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

निवडणूक अर्ज भरताना स्वतःवर गुन्हे असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे जाहीर करणारांची संख्या ४७ टक्के ते ६४ टक्के आहे. या टप्प्यात राज्यातील तब्बल ८४ (८९%) मतदारसंघ संवेदनशील-अतिसंवेदनशील जाहीर झाले आहेत. या टप्प्यातील तब्बल ४९५ (३४ टक्के) उमेदवार कोट्यधीश आहेत. त्यांची सरासरी मिळकत १ कोटी ७२ लाख रूपये आहे. दुसऱ्या टप्प्यात ज्यांना तिकीटे मिळाली आहेत त्यात खून, अपहरण, खंडणीखोरी, बलात्कार, फरार झालेले, अशा साऱ्या ‘गुणवंतांचा’ समावेश आहे. कायदे बनविणाऱ्या संस्थांवर निवडून जाणाऱ्या लोकप्रतीनिधींचे किमान चारित्र्य तरी पक्षांनी पाहिले पाहिजे, या सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेचा व दिशानिर्देशांचा परिणाम राजकीय पक्षांवर बिहारमध्ये एक तर अजिबात होत नाही किंवा अत्यल्प होतो हे पुन्हा दिसले. ‘गुन्हेगारांना तिकीटे दिली तर संबंधित पक्षांनी त्याची कारणे दाखवावीत व असेच उमेदवार का निवडावे लागतात याबाबतही सांगावे’ असे निर्देश न्यायालयाने फेब्रुवारीत दिले होते. 

Edited By - Prashant Patil