म्हशीच्या पाठीवर बसून उमेदवार गेला अर्ज भरायला...

वृत्तसंस्था
Wednesday, 7 October 2020

बिहार विधानसभा निवडणूकीसाठी एका उमेदवाराने चक्क म्हशीच्या पाठीवर बसून उपविभाग कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज भरला. संबंधित उमेदवाराचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.

पाटणा (बिहार): बिहार विधानसभा निवडणूकीसाठी एका उमेदवाराने चक्क म्हशीच्या पाठीवर बसून उपविभाग कार्यालयात जाऊन उमेदवारी अर्ज भरला. संबंधित उमेदवाराचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत. यामुळे या उमेदवाराचा जोरदार प्रचार झाल्याची चर्चा राज्यात रंगली आहे.

आमदाराने केला 17 वर्षांनी लहान असलेल्या प्रेयसीसोबत विवाह; पण...

पालीगंज विधानसभेसाठी पीपल पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिव्ह या पक्षाकडून रविंद्र प्रसाद उर्फ कपिल यादव यांनी मोटार, मोटारसायकल नव्हे तर म्हशीच्या पाठीवर बसून उमेदवारी अर्ज भरला आहे. पालीगंजमध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून यादव यांची ओळख आहे. म्हशीवर बसून अर्ज भरायला का गेलात? असे विचारल्यानंतर ते म्हणाले, 'मी प्राणीप्रेमी आहे. लालूजी म्हशीच्या पाठीवर बसून, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसू शकतात, तर मी किमान आमदार नक्कीच होईन.'

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. राजकीय नेते उमेदवारी अर्ज भरण्यासाठी व्यस्त आहेत. यादरम्यान, आमदार होण्याचे स्वप्न पाहणारा एक नेता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खास शैलीत उपविभाग कार्यालयात पोहोचल्यामुळे यादव चर्चेत आले आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या दिवशी पालीगंज उपविभाग कार्यालयात महाआघाडीचे उमेदवार आणि आठ अपक्ष उमेदवारांनी निवडणूक अधिकारीसह एसडीओसमोर अर्ज दाखल केले. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये, महायुतीच्या सीपीआय-एमएलचे उमेदवार संदीप सौरभ, लोकसेवा पक्षाचे राजगीर प्रसाद, इंडियन पीपल्स पार्टीचे रवीश कुमार, अपक्ष बसंत कुमार, जितेंद्र बिंद, हरे कृष्णा यांच्यासह पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचे रवींद्र प्रसाद यांचा समावेश आहे. दरम्यान,  बिहार विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, २४३ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. बिहारमध्ये २८ ऑक्टोबरपासून ३ टप्प्यात निवडणूक होणार असून १० नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bihar election ravindra yadav alias kapil yadav went on buffalo for nomination