

Bihar Election Results 2025
esakal
PM Narendra Modi: बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाले आहेत. एनडीएने २०२ जागा जिंकल्या तर महाआघाडीला केवळ ३५ जागांपर्यंत मजल मारता आली. एनडीएमध्ये भाजपने ९०, जेडीयूने ८४, जिंकल्या. महाआघाडीमध्ये आरजेडीने २५, काँग्रेसने ६ जागा जिंकल्या. सोबत घटकपक्षांनीही काही जागा जिंकल्या आहेत. बिहारमधल्या दणदणीत विजयानंतर दिल्लीत भाजप मुख्यालयात विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांची उपस्थिती होती.