
Bihar election: बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखांची अद्याप घोषणा झाली नसली तरी, नोव्हेंबरपूर्वी त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नुकतेच एक सर्वेक्षण समोर आले आहे, ज्याचे आकडे धक्कादायक आहेत. ओपिनियन पोलनुसार, या निवडणुकीत एनडीए (NDA) आणि इंडिया (INDIA) आघाडीला किती जागा मिळू शकतात, याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. प्रशांत किशोर यांचा जन सुराज पक्षही निवडणुकीच्या मैदानात असणार आहे.