esakal | शेवटच्या श्वासापर्यंत पंतप्रधान मोदींसोबत असेन- चिराग पासवान
sakal

बोलून बातमी शोधा

chirag_20paswan_20narendra_20modi

बिहार निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे.

शेवटच्या श्वासापर्यंत पंतप्रधान मोदींसोबत असेन- चिराग पासवान

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पाटणा- बिहार निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. अशात लोक जनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे धन्यवाद मानले आहेत. ही मोठ्या गर्व आणि सन्मानाची गोष्ट आहे की पंतप्रधान मोदी 2020 च्या विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदा बिहारमध्ये येतात आणि वडिलांची आठवण काढतात, त्यांना श्रद्धांजली देतात. एक मुलगा असल्याने माझ्यासाठी तो भावुक क्षण होता. ते म्हणाले की शेवटच्या श्वासापर्यंत ते त्यांच्यासोबत होते. मलाही वाटतं की मी शेवटच्या श्वासापर्यंत पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या विचारांसोबत उभे राहवं. मी पंतप्रधान मोदींच्या विकासाच्या मुद्द्यांसोबत नेहमी होतो आणि आहे. जसं पंतप्रधानांनी म्हटलं मी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांच्यासोबत असेन, असं पासवान म्हणाले आहेत. 

भाजप आणि पंतप्रधान मोदी एकच आहेत, पण माझं भारतीय जनता पार्टीशी जोडले जाण्यासाठीचे सर्वात मोठे कारण मोदी आहेत. मी पंतप्रधान मोदींसोबत होतो आणि आहे. भाजपच्या काही नेत्यांनी मला लक्ष्य केले, पण मला त्याचे वाईट वाटले नाही. कारण मी मोदींच्या विचारासोबत आहे, असंही ते म्हणाले आहेत. पासवान यांनी 370 च्या मुद्द्यावरही भाष्य केले. कलम 370 मुद्यावर लोक जनशक्ती पार्टीने नेहमीच मोदींना साथ दिली आहे. संसेदत मी या कलमाचे समर्थन केले होते. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कलम 370, ट्रिपल तलाक किंवा CAA या मुद्द्यांना विरोध केला होता. त्यांनी विधानसभेत प्रस्तावही पारित केले होते, पंतप्रधान मोदींनी जे सभेत म्हटलं त्यावर मुख्यमंत्री असहमत असतील, असं ते म्हणाले आहेत. 

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका...

निवडणुकीसंबंधी चिराग पासवान म्हणाले की, आमची हिंमत मजबूत आहे. माझे मोंदीसोबत काय संबंध आहेत, याचा मला प्रचार करण्याची गरज नाही. राजकीय मार्ग वेगळा निवडला आहे पण तरीही मी पंतप्रधान मोदींच्या विचारांसोबत आहे. माझा वेगळा पक्ष आहे, वेगळी नीती आहे, वेगळे विचार आहेत. माझा पक्ष आपल्या विचाराने पुढे जात आहे आणि तो 'बिहार फर्स्ट बिहारी फर्स्ट'वर विश्वास ठेवणारा आहे. 

चिराग यांनी यावेळी नितीश कुमारांवर टीका केली. ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला आहे, ते लोक तुरुंगात जातील. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मुख्यमंत्री आले तर त्यांनाही तुरुंगात जावं लागेल. जो कोणी दोषी असेल, त्याला सोडलं जाणार नाही. प्रचारसभेत नितीश कुमार यांना लोकांकडून जास्त प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे, अशी टीका त्यांनी केली. दरम्यान, चिराग पासवान यांनी भाजपविरोधात उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 

loading image