
नवी दिल्ली : बिहारमधील मतदारयाद्यांच्या सखोल पडताळणीची (एसआयआर) प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मतदारांना नवीन ओळखपत्रे देण्याचा विचार निवडणूक आयोग करत आहे. नवीन ओळखपत्रे नेमकी कधी दिली जाणार, याबाबतचा अंतिम निर्णय अद्याप झाला नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.