esakal | बिहार निवडणूक : माजी DGP गुप्तेश्वर पांडे यांची राजकारणात एन्ट्री; सत्ताधारी पक्षात प्रवेश
sakal

बोलून बातमी शोधा

Gupteshwar_20Pandey.jpg

बिहारच्या डिजीपी पदावर राहिलेल्या गुप्तेश्वर  पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती.

बिहार निवडणूक : माजी DGP गुप्तेश्वर पांडे यांची राजकारणात एन्ट्री; सत्ताधारी पक्षात प्रवेश

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

पटना- गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत असणारे बिहारचे माजी डिजीपी गुप्तेश्वर पांडे हे जेडीयू म्हणजेच जनता दल युनायटेडमध्ये सामील झाले आहेत. नितीश कुमार यांच्या पक्षात प्रवेश करुन गुप्तेश्वर पांडे राजकीय कारकिर्दीला सुरुवात करत आहेत. पांडे यांनी आज अधिकृतरित्या जेडीयूत प्रवेश केला. एएनआयने या संदर्भातील वृत्त दिलं आहे.  स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर लगेचच गुप्तेश्वर पांडे यांचा राजकारणात प्रवेश होत आहे. 

बिहारच्या डिजीपी पदावर राहिलेल्या गुप्तेश्वर  पांडे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. 24 तासातच त्यांची स्वेच्छानिवृत्ती  स्विकारण्यात आली होती. यानंतरच असा अंदाज लावला जात होता की ते वाल्मिकीनगरमधून लोकसभा मतदार संघातून पोटनिवडणूक लढवू शकतात. नीतीन कुमार यांच्या नेतृत्वात चालणाऱ्या जनता दल युनायटेडकडून त्यांना वाल्मिकी नगर मतदारसंघातील पोटनिवडणूक लढवण्यास संधी मिळू शकते. 

Bihar Election: बिहारचे कळीचे मुद्दे आणि भरकटलेली निवडणूक!

पांडे राजकारणात येणार आहेत, अशी चर्चा जोरदारपणे सुरु होतीच. त्यांचा कार्यकाळ संपण्यासाठी फक्त  पाचच महिने उरले असताना त्यांनी ही स्वेच्छानिवृत्ती स्विकारली आहे. मात्र, यावर काँग्रेसने भाजपवर निशाना साधताना म्हटलं होतं की, सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात महाराष्ट्रावर टिका करण्यासाठी भाजपने जाणीवपूर्वक पांडे यांचा वापर केला आहे. म्हणूनच, आता त्यांना बक्षिस म्हणून राजकारणात संधी दिली जात आहे. यावर उत्तर देताना गुप्तेश्वर पांडे म्हटलं होतं की, राजकारणात माझा कुणीही गॉडफादर नाहीये. अथवा माझ्या कुंटुंबाचीही कसलीही राजकीय पार्श्वभूमी नाहीये. काहींना हेच पचत नाहीये. 

गुप्तेश्वर पांडे यांनी सुशांतसिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्रातील सरकारवर चांगलेच तोंडसुख घेतले होते. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपुर्द करावा अशी मागणीही त्यांनी केली होती. यावर प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने त्यांच्यावर जोरदार टिकाही केली होती. दरम्यान, शुक्रवारी बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली. या पार्श्वभूमीवरच ही एक मोठी बातमी आहे.