esakal | बिहारसह अनेक राज्यांत पावसाचे थैमान; ८१ लाख लोकांना फटका
sakal

बोलून बातमी शोधा

Bihar Flood Situation Grim 16 Districts Affected

कोरोनाचे संकट मोठ्या प्रमाणावर असतानाच बिहारमध्ये पावसाने थैमान घातले असून त्यामुळे आलेल्या पुराचा एकूण १५ जिल्ह्यांना फटका बसला आहे.

बिहारसह अनेक राज्यांत पावसाचे थैमान; ८१ लाख लोकांना फटका

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पटना : कोरोनाचे संकट मोठ्या प्रमाणावर असतानाच बिहारमध्ये पावसाने थैमान घातले असून त्यामुळे आलेल्या पुराचा एकूण १५ जिल्ह्यांना फटका बसला आहे. पुराच्या पाण्यामुळे शेतीबरोबरच लोकांच्या घरांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून आतापर्यंत बिहारमध्ये जवळपास २५ जणांचा मृत्यू झाला आहे. पुराचा फटका जवळपास ८१ लाख लोकांना बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पूराच्या पाण्यामुळे बिहारमधील संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले असून सिंगरा नदीची पाणी पातळी वाढल्याने अनेक लोकांची घरे पाण्याखाली गेली असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत जवळपास बिहारमधील अंदाजे २००० हेक्टर शेती क्षेत्र पाण्याखाली आल्याचेही सांगण्यात आले आहे. 

उत्तर पूर्व राज्यांनाही पूराचा मोठ्या प्रमाणात फटका बसला असून पावसाच्या पाण्याने लोकांचे उत्तर पूर्व भागातही हाल होत आहेत. आसाममधील तीन जिल्हे धेमाजी, लखीमपुर आणि बक्सा या तीन जिल्ह्यांना पूराचा मोठा तडाखा बसला असून ते तीन जिल्हे अजूनही यातून सावरलेले नाहीत. एकूण ११ हजार ९०० लोकांना या तीन जिल्ह्यात पूराच्या पाण्याचा फटका बसला आहे. या भागात १३८ लोकांचा मृत्यूही झाला आहे. भूस्खलनामध्ये एकूण २६ लोकांचा मृत्यू झाला आहे. या तीन जिल्ह्यात २८ गावे आणि १५३५ हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली असल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाकडून वर्तविण्यात आला आहे.

दरम्यान, छत्तीसगढमधील बिलासपुरच्या खूंटाघाटमधील नदीला आलेल्या पूराच्या पाण्यात अडकलेल्या एका युवकाला भारतीय हवाईदलाने हॅलिकॉप्टरच्या सहय्याने वाचवले आहे. या युवकाने नदीला पूर आला असता संपूर्ण रात्रभर एका झाडावर बसून स्वतःचा जीव वाचवला. गुजरातमध्येही पावसाच्या पाण्याने थैमान घातले असून जामनगर, सूरत आणि वडोदरामध्ये पूरस्थिती गंभार आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेशमध्येही अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून परिस्थिती गंभीर रुप धारण करत आहे.