Nitish Kumar : बिहारमध्ये सामाजिक सुरक्षा योजनेच्या पेन्शनमध्ये वाढ
Bihar News : बिहारमध्ये मुख्यमंत्री नीतिशकुमार यांच्या नेतृत्वाखाली विधवा, ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्यात आली आहे. आता दरमहा ४०० रुपयांऐवजी त्यांना ११०० रुपये पेन्शन मिळणार असून, जुलै महिन्यापासून ही वाढ लागू होईल.
पाटणा : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले असताना राज्यातील नीतिशकुमार सरकारने विधवा, ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.