
CM Nitish Kumar : दारूमुळे मृत्यू झाल्यास भरपाई नाही; नितीशकुमार
पाटणा : बिहारमध्ये दारुबंदीच्या मुद्द्यावरुन वातावण तापले आहे. दारूमुळे मृत्यू झाल्यास कोणालाही नुकसानभरपाई मिळणार नाही. असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. सारण जिल्ह्यात बिहार दारूमुळे बळी पडलेल्यांची संख्या ६१ झाली आहे. या प्रकरणी आतापर्यंत १२६ लोकांना अटक करण्यात आली आहेत. तसेच चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सारण जिल्ह्यापाठोपाठ सिवान जिल्ह्यातील भगवानपूरमध्येही विषारी दारूमुळे गुरुवारी (ता.१५) रात्री उशिरा पाच जणांचा मृत्यू झाला. सारणमध्ये ज्या दारूमुळे बळी पडले, तिच दारू सिवानमध्ये पोहोचली होती, असे सांगण्यात आले.
दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये गेल्या सहा वर्षांत एक हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे, असा दावा भाजपचे नेते आणि खासदार सुशीलकुमार मोदी केला. दारूबंदी पोकळ ठरली असल्याचे सांगत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात चौथ्या दिवसाच्या सत्रात नितीशकुमार यांनी ‘दारू प्याल, तर मराल, याचा पुनरुच्चार केला.