बिहार - सुशांत सिंह राजपूतच्या ५ नातेवाईकांचा अपघाती मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिहार - सुशांत सिंह राजपूतच्या ५ नातेवाईकांचा अपघाती मृत्यू

ट्रक आणि सुमो यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत जागेवरच सहा जण ठार झाले.

बिहार - सुशांत सिंह राजपूतच्या ५ नातेवाईकांचा अपघाती मृत्यू

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पाटणा - बिहारमधील जमुई इथं भीषण अपघात झाला आहे. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. सिकंदराजवळच्या हलसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. ट्रक आणि सुमो व्हिक्टा यांच्यात झालेली ही धडक इतकी भीषण होती की अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सिकंदरा शेखपूर मार्गावर असलेल्या पिपरा गावाजवळ हा अपघात झाला. लालजीत सिंह यांच्या पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी ते सर्वजण गेले होते. मृतांपैकी ५ जण हे जमुईतील नौडीहा इथले तर एकजण चौहान जी भागातला आहे. अंत्यसंस्कार करून परत येताना हा अपघात झाला होता.

हेही वाचा: ‘आयबी’च्या प्रमुखांचाही कार्यकाल वाढविला

मृतांमध्ये पाच जण हे दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे नातेवाईक होते अशी माहिती आता समोर आली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीच्या पतीच्या कुटुंबातील नातेवाईकांचा मृतांमध्ये समावेश आहे. एडीजी ओमप्रकाश सिंह यांचे नातेवाईक असलेले लालजीत सिंह आणि त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्य अपघातात जागीच ठार झाले आहेत.

ट्रक आणि सुमो यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत जागेवरच सहा जण ठार झाले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या चार जणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली होती. सध्या या अपघाताची नोंद पोलिसात झाली असून अधिक तपास केला जात आहे. मृत आणि जखमींच्या कुटुंबियांना या अपघाताची माहिती देण्यात आली आहे.

loading image
go to top