Bihar viral video case: जमुई अल्पवयीन मुलीचं छेडछाड प्रकरण! राष्ट्रीय महिला आयोग आक्रमक, पोलीस महासंचालकांना कठोर निर्देश

NCW Directs Bihar DGP Strict Action: व्हायरल व्हिडिओ फुटेजच्या आधारे सर्व आरोपींची ओळख पटवून त्यांना तातडीने अटक करावी आणि एका निश्चित मुदतीमध्ये या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी पूर्ण करावी, असेही आयोगाने पत्रात ठामपणे नमूद केले आहे.
bihar crime viral video

bihar crime viral video

esakal

Updated on

Jamui Minor Harassment: बिहारच्या जमुई जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीला आणि तिच्या मित्राला रस्त्यात अडवून त्यांच्याशी गैरवर्तन, मारहाण आणि छेडछाड केल्याच्या धक्कादायक घटनेची राष्ट्रीय महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी बिहारच्या पोलीस महासंचालकांना थेट पत्र लिहून तत्काळ एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com