

Son River Water Sharing Dispute Ends After 25 Years As Bihar And Jharkhand Reach Agreement On Water Distribution
esakal
बिहार आणि झारखंडदरम्यान गेल्या २५ वर्षांपासून सुरू असलेल्या सोन नदीच्या पाणीवाटपाच्या वादावर अखेर तोडगा निघाला आहे. अविभाजित बिहारला १९७३च्या बाणसागर करारानुसार मिळालेल्या पाण्याचे दोन्ही राज्यांमध्ये विभाजन करण्यावर सहमती झाली असून, बिहारला ५.५७ दशलक्ष एकर फूट (MAF) तर झारखंडला २.०० MAF पाणी देण्याचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे.