Bihar Exit Poll - कोणालाच स्पष्ट बहुमत नाही, सत्तेचं गणित फिस्कटणार

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 7 November 2020

बिहारमध्ये विधानसबा निवडणूकीच्या (bihar Election) तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पड़लं असून Exit Poll समोर आले आहेत. यामध्ये कोणालाच स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पाटणा - बिहारमध्ये विधानसबा निवडणूकीच्या (bihar Election) तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पड़लं असून Exit Poll समोर आले आहेत. यामध्ये कोणालाच स्पष्ट बहुमत मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  बिहार विधानभेत 243 जागा असून बहुमतासाठी 122 जागांची गरज आहे. टाइम्स नाऊ सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार महाआघाडीला 120 तर एनडीएला 116 जागा मिळतील असं म्हटलं आहे. यामुळे बहुमताचा जादुई आकडा मिळवण्यासाठीचं गणित फिस्कटण्याची चिन्हे दिसत आहेत. 

एक्झिट पोलमध्ये पक्षानुसार कोणाला किती जागा मिळतील याचेही अंदाज दिले आहेत. त्यानुसार आरजेडीला सर्वाधिक 85 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर त्याखालोखाल भाजपला 70 तर जदयूला 42 आणि काँग्रेसला 25 जागी विजय मिळतील असं म्हटलं आहे. 

हे वाचा - Bihar Election : तिसऱ्या टप्प्यात झाले 55.22 टक्के मतदान

आरजेडी आणि काँग्रेसच्या आघाडीला 120 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामध्ये  आरजेडीला 85, काँग्रेसला 25 तर इतर दहा ठिकाणी विजय मिळेलं असं म्हटलं आहे. तर एनडीएमध्ये भाजपला सर्वाधिक 70 आणि जदयूला 42 जागी विजय मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय HAM-S आणि VIP ला प्रत्येकी दोन जागा मिळतील असं एक्झिट पोलमध्ये म्हटलं आहे.

तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात 15 जिल्ह्यांमध्ये 78 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. तिसऱ्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 55.22 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. यामध्ये 78 जागांवर 1204 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे. निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bihar lection exit poll bjp rjd congress jdu voting