
पाटणाः जन सुराज पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांच्याविरोधात बिहारचे मंत्री अशोक चौधरी यांनी १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. अशोक चौधरी, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, आरोग्य मंत्री मंगल पांडे आणि भाजपचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष खासदार दिलीप जायस्वाल यांच्यावर प्रशांत किशोर यांनी आर्थिक आणि नैतिक भ्रष्टाचाराचे आरोप नुकतेच केले आहेत.