मुझफ्फरपूर (बिहार) : मुझफ्फरपूर (Muzaffarpur) जिल्ह्यातील देवरिया कोठी परिसरात एका विवाहितेवर पतीकडून अमानुष अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अवैध संबंधाचा संशय घेत पतीने तिला दोन दिवस एका खोलीत बंद ठेवत गंभीर शारीरिक व मानसिक छळ केला. या प्रकरणी पोलिसांनी (Police) आरोपी पतीला अटक केली असून, सासरच्या इतर सदस्यांचा शोध सुरू आहे.