

Husband Leaves to Buy Sweets, Newlywed Wife Escapes With Lover
ESakal
बिहारमधील मधेपुरा येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रक्षाबंधनासाठी आपल्या पत्नीला तिच्या माहेरी सोडायला निघालेला एक तरुण मिठाई घेऊन परत आला असता त्याची पत्नी तिथे नसल्याने त्याला धक्काच बसला. खूप शोधाशोध करूनही ती न सापडल्याने कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. तपासात हे एक प्रेमप्रकरण असल्याचे उघड झाले. सुमारे दोन तासांत पोलिसांनी महिलेला शोधून काढले आणि तिच्या प्रियकराला अटक केली. पुढील कायदेशीर कारवाईसाठी दोघांनाही पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.