Accident News: वीटभट्टीची चिमणी पेटली, मिठाई वाटली अन्... ९ मजूरांचा जागीच मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident News

Accident News: वीटभट्टीची चिमणी पेटली, मिठाई वाटली अन्... ९ मजूरांचा जागीच मृत्यू

बिहारमधील मोतिहारी येथे चिमणी दुर्घटनेतील मृतांची संख्या 9 वर पोहोचली आहे. मृतांचा आकडा वाढण्याचीही दाट शक्यता आहे. खरं तर, रामगढवा पोलीस स्टेशन हद्दीतील चंपापूर नरीरगीर चौकात एका वीटभट्टीला आग लागल्यानंतर त्याच्या चिमणीत मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर ती खाली पडली. चिमणीत खाली खचल्यामुळे गेल्याने 9 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 15 जण जखमी झाले असून, अनेकांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना रक्सौल येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले आहे.

घटनेनंतर तेथे गाडलेल्या लोकांच्या शोधात ढिगाऱ्यासमोर लोकांचा जमाव जमला. कोणाचा तरी जीव वाचेल या आशेने लोक ढिगारा हटवण्याचा प्रयत्न करत होते. या घटनेबाबत सांगण्यात येत आहे की, पहिली चिमणी फुंकण्याचा सोहळा पार पडल्यानंतर कामगारांनी चिमणीला आग लावून जल्लोष केला आणि धूर वर पोहोचला त्यानंतर मिठाई वाटली जात होती.

हेही वाचा: Accident News : पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रक-कारचा भीषण अपघात; दुर्घटनेत 4 जण जखमी

यादरम्यान चिमणीचा ऑपरेटरही धूर निघताना पाहत उभा होता. दरम्यान, चिमणीत मोठा स्फोट झाला आणि ऑपरेटरसह 9 जणांचा ढिगाऱ्याखाली दाबलं गेल्यामुळे जीव गेला. शुक्रवारी झालेल्या अपघातानंतर रात्री धुक्यामुळे बचावकार्यात मोठी अडचण निर्माण झाली होती, त्यामुळे सकाळपासून पुन्हा बचाव आणि मदतकार्य सुरू करण्यात आलं. सर्व मृतांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सदर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: MLA Jaykumar Gore Accident : अपक्ष, काँग्रेस ते भाजप; कोण आहेत जयकुमार गोरे

टॅग्स :Biharaccident