बिहारमधून एक अतिशय वेदनादायक आणि लज्जास्पद घटना समोर आली आहे. बलात्काराचा बळी ठरलेल्या एका अल्पवयीन मुलीला पाटणा मेडिकल कॉलेज रुग्णालयाच्या (PMCH) बाहेर तासनतास रुग्णवाहिकेत (Ambulance) वाट पाहावी लागली. अनेक प्रयत्नांनंतर पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, दुखापत इतकी गंभीर होती की दुसऱ्या दिवशी सकाळी अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला.