दिल्ली विधानसभेत ‘बिहारी बाबूं’चा प्रभाव

उज्‍ज्वलकुमार
Thursday, 13 February 2020

बिहारचे विजयी उमेदवार
संजीव झा, ऋतुराज, विनय मिश्रा, राजेश ऋषी, सोमनाथ भारती, गोपाळ राय, दिनेश मोहनिया, महेंद्र यादव (सर्व जण ‘आप’चे आमदार), अभय वर्मा (भाजप)

पाटणा - दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) भाजपला अक्षरशः धूळ चारली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली ‘आप’चे ६२ उमेदवार निवडून आले. त्यांच्या विजयात बिहारी मतदारांचा मोठा वाटा आहे. त्याचप्रमाणे त्यातील दहा विजयी उमेदवार हे मूळचे बिहारचे आहेत. यंदा बिहारचे दहा नेते दिल्लीचे आमदार बनले आहेत. यातील एक भाजपचे अभय वर्मा आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आपच्या दहा बिहारी उमेदवारांच्या गळ्यात यंदा दुसऱ्यांदा विजयी माळ पडली. विबुराडी मतदारसंघात ‘जेडीयू’च्या शैलेंद्र कुमार यांना ४८ हजार २२० मते मिळाली. संगम विहारमधून ‘जेडीयू’च्या शिवचरणलाल गुप्ता यांना ३२ हजार ८०३ मते मिळाली. या मतदारसंघातून ‘आप’चे दिनेश मोहनिया विजयी झाले. मोहनिया हेही बिहारचे रहिवासी आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत ‘एलजेपी’ला सीमापुरी मतदारसंघ देण्यात आला होता. या पक्षाचे उमेदवार शांतिलाल हे ३२ हजार १३८ मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिले. ‘आरजेडी’च्या तीन उमेदवारांना ६०० मतेही मिळाली नाहीत. बुराडीतील त्यांचे उमेदवार प्रमोद त्यागी यांना दोन हजार २५६ मते मिळाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bihar people mla in delhi politics