
Nitish Kumar may become Vice President and BJP eyes on Bihar CM post: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी रात्री उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. त्यांनी जरी प्रकृतीच्या कारणाने राजीनामा दिला असल्याचं सांगितलं असलं तरी, त्यांच्या राजीनाम्यावरून आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. धनखड यांनी कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा दिल्याने, वेगवेगळे अंदाज वर्तवले जात आहेत.
काहींचे म्हणणे आहे की हा भाजपचा मोठा डाव आहे. विशेष करून आगामी काळात होणाऱ्या बिहार निवडणुकीआधीच ही मोठी घडामोड घडली असल्याने, आता यावरून भलत्याच चर्चाही सुरू झाल्या आहेत. त्यामध्ये आता भाजप बिहरामध्ये आपला मुख्यमंत्री करणार आणि नितीशकुमारांना थेट उपराष्ट्रपती बनवणार असल्याचंही बोललं जात आहे.
विशेष म्हणजे, बिहारमधील भाजप आमदार हरिभूषण ठाकूर बचौल यांनीही या चर्चेला हवा देणारं एक विधान केलं आहे. त्यांनी म्हटलंय की, सर्वांनाच नितीशकुमार हे उपराष्ट्रपती झालेल पाहायचं आहे. बिस्फी विधानसभा मतदारसंघातील आमदार बचौल म्हणाले की, नितीशकुमार यांना उपराष्ट्रपती बनवण्यापेक्षा चांगले काय असू शकते? नितीशकुमार उपराष्ट्रपती बनतील किंवा नाही बनतील, पण सर्वांना मात्र हेच हवं आहे.
याशिवाय मंत्री प्रेमकुमार म्हणाले, बिहारमधील जर कुणी उपराष्ट्रपती झालं तर मला आनंद होईल. मात्र हे केंद्र सरकार ठरवेल. माजीमंत्री नीरज कुमार सिंह बबलू म्हणाले, ही चागंली गोष्ट आहे. जर नितीशकुमार उपराष्ट्रपती झाले तर त्यात काय अडचण आहे? जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता उपराष्ट्रपती पदाबाबत अनेक नावं चर्चेत आहेत, त्यामध्ये नितीशकुमार यांचंही नाव घेतलं जात आहे. तर नितीशकुमाराचं नाव चर्चेत आल्याचं पाहून विरोधकांनाही धक्का बसला आहे. कारण, खरंच भाजप असा काही खेळ करू शकतं, असंही त्यांना चांगलंच माहिती आहे.
काही राजकीय तज्ज्ञांच्या मते भाजप आगामी काळात होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीत आपला उमेदवार मुख्यमंत्रिपदासाठी समोर करेल आणि नितीशकुमारांना उपराष्ट्रपदाची संधी देऊ शकतो. तर नितीशकुमारांचा पक्ष जदयूचा बिहारमध्ये उपमुख्यमंत्री असेल, असंही सांगितलं जात आहे. आता उपराष्ट्रपती पदावर नक्की कोणाची वर्णी लागेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.