Bihar ASI Case
esakal
Bihar ASI Case : बिहारच्या सीवन जिल्ह्यात एक थरारक आणि संतापजनक घटना घडली आहे. दरौंडा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक उपनिरीक्षक (एएसआय) अनिरुद्ध कुमार यांची अज्ञात व्यक्तींनी निर्घृण हत्या केली असून, त्यांचा मृतदेह निर्जन भागात फेकून देण्यात आला आहे. या घटनेने पोलिस दलात खळबळ उडाली असून संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.