नितीशकुमार यांचा योगाभ्यास तर तेजस्वी यांचा ‘मूड ऑफ’

मुझफ्फरपूर: बिहार विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी शुक्रवारी मतदान केंद्रावर इव्हीएम मशिनसह रवाना होता सुरक्षा दलाचे कर्मचारी.
मुझफ्फरपूर: बिहार विधानसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी शुक्रवारी मतदान केंद्रावर इव्हीएम मशिनसह रवाना होता सुरक्षा दलाचे कर्मचारी.

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा शनिवारी पार पडत असून आदल्यादिवशी म्हणजे शुक्रवारचा दिवस बहुतांश नेत्यांनी आरामात घालवला. 

मुख्यमंत्री नितीशकुमार हे आपल्या नेहमीच्या दिनचर्येत व्यग्र राहिले. गेले काही दिवस प्रचारात बिझी राहिलेले नितीशकुमार यांनी आज सकाळी योगाभ्यास केला. वर्तमानपत्राचे वाचन करत आराम केला. नंतर राज्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा ही केली. त्याचबरोबर शनिवारी होणाऱ्या शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी कंबर कसली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राजद नेते तेजस्वी यादव यांच्यासाठी शुक्रवारचा दिवस फारसा उत्साहवर्धक राहिला नाही. वडिल लालूप्रसाद यादव यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलल्याने ते नाराज राहिले. दिवसभर ते आई राबडी देवी यांच्यासमवेत होते. दुपारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या. लोजपचे अध्यक्ष चिराग पासवान यांचा देखील दिवस सर्वसाधारणच राहिला. चिराग पासवान देखील सकाळी साडेसात वाजता उठले आणि योगासन केल्यानंतर वृत्तवाहिन्या पाहण्यात बिझी राहिले. काही वृत्तवाहिन्यांचे पत्रकार मुलाखतीसाठी दिल्लीहून आले होते. ते दुपारपर्यंत मुलाखतीत व्यग्र राहिले. त्यानंतर काही उमेदवारांशी चर्चा केली. लोजपचे प्रदेशाध्यक्ष मदन मोहन झा यांनीही आज आराम केला. ते सदाकत आश्रमात गेले. तेथे पक्ष नेत्यांशी चर्चा केली.

कॉंग्रेस नेते दिल्लीला परतले
विधानसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर दिल्लीचे कॉंग्रेस नेते परत गेले. यात प्रामुख्याने कॉंग्रेसचे सरचिटणीस रणदिप सुरजेवाला, बिहारचे प्रभारी शक्तिसिंह गोहिल, पवन खेडा यांचा समावेश होता. या नेत्यांनी महाआघाडीच्या घटक पक्षांशी ताळमेळ ठेवत प्रचाराची धुरा सांभाळली होती.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com