उमर खालिदला झटका; UAPA अंतर्गत खटला चालवण्यास केजरीवाल सरकारची मंजूरी

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 6 November 2020

उमर खलिद याने मोदी सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर वेळोवेळी बऱ्याच वेळी टीका केली आहे.

नवी दिल्ली-  फेब्रुवारी महिन्यात राजधानी दिल्लीत झालेल्या दंगलीप्रकरणी विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्याविरोधात अनलॉफूल अॅक्टिविटीज प्रिवेंशन अॅक्टनुसार  (UAPA) खटका चालवण्यास अरविंद केजरीवाल सरकारने परवानगी दिली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांना आप सरकारकडून खालिद  विरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे. 

उमर खालिद हा JNUचा माजी विद्यार्थी आहे. दिल्ली पोलिसांनी अनलॉफूल अॅक्टिविटीज प्रिवेंशन अॅक्टनुसार (UAPA) उमर खालिदला अटक केली होती. उमर खालिदला 31 जूलैला चौकशीसाठी बोलावला होतं. त्यावेळेस त्याचा मोबाईलही जप्त केला होता.11 तासांच्या चौकशीनंतर उमरला खालिदला अटक केली आहे. 

न्यूझीलंडच्या संसदेत घुमला भारतीय भाषेचा आवाज; व्हिडिओ होतोय व्हायरल

कोण आहे विद्यार्थी नेता उमर खालिद?

उमरचे कुटुंब 30 वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील अमरावतीमधून दिल्ली येथे गेले होते. उमर खलिद हा दिल्लीतील झाकिरनगर भागात राहायचा. त्याचे वडील एक उर्दु मासिक चालवायचे. जेएनयू विद्यापिठातून समाजशास्त्र विभागातून उमर खालिदने इतिहास विषयात एमए आणि एम- फिल केलं आहे. सध्या उमर जेएनयूतून पीएचडी करत आहे. 2016 मध्ये संसद हल्ल्यातील दोषी अफझल गुरू याच्यासंदर्भात विद्यापीठ परिसरात झालेल्या कार्यक्रमात देशविरोधी नारे देण्यात आल्याचे समोर आलं होतं. या कार्यक्रमाचं आयोजन केल्याप्रकरणी जेएनयूतील विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अन्य मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासूनच देशभरात उमर खालिद हा चर्चेचा विषय ठरला होता .

उमर खलिद आणि वाद...

उमर खलिद याने मोदी सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर वेळोवेळी बऱ्याच वेळी टीका केली आहे. तसेच जेएनयूत हिंदू देवी- देवतांचे आक्षेपार्ह चित्र लावून तेढ निर्माण केल्याचा आरोपही खालिदवर झाला होता. तसेच अफझल गुरुला फाशी देण्यात आली त्या दिवशी जेएनयूत मोठी शोकसभाही झाली होती. यातही खलिद सहभागी झाल्याचे सांगितलं जातंय. तसेच खलिदने वेळोवेळी काश्मीरला स्वातंत्र्य देण्याची मागणी केली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Riots conspiracy case Delhi govt gives nod to prosecute Umar Khalid under UAPA