Bihar Voter List Scandal: Nepal, Bangladesh, Myanmar Citizens Found : बिहारमध्ये लवकरच विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने तयारीही सुरु केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचं पुर्नसर्वेक्षण करण्यात आहे. मात्र, या दरम्यानच या मतदार याद्यांमध्ये चक्क नेपाळ, बांगलादेश आणि म्यानमारचे नागरिक आढळून आले आहेत. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तसेच विविध चर्चांनाही उधाण आलं आहे.