Gurugram AccidentESakal
देश
Accident: चूक कोणाची? वेगाने Bike पळवणाऱ्या तरुणाची, की त्या SUV चालकाची.... थरार Video Viral
Gurugram Accident: गुरुग्राममधील DLF फेज-2 मेट्रो स्टेशनजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या XUV कारला वेगात जाणाऱ्या दुचाकीची धडक झाली. अपघाताचा व्हिडिओ: या अपघातात बाईक चालवणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाला. गेल्या रविवारी ही घटना घडल्याचे सांगण्यात आले.
दिल्लीला लागून असलेल्या हरियाणातील गुरुग्राममध्ये रविवारी बाईक आणि महिंद्रा 3XO SUV यांच्यात झालेल्या भीषण टक्करचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. या अपघातात भरधाव दुचाकी चालवणाऱ्या अक्षत गर्ग नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. मयत अक्षत गर्ग हा रविवारी रात्री सुसाट वेगाने दुचाकी चालवत असताना चुकीच्या बाजूने येणाऱ्या महिंद्रा 3XO ने दुचाकीस्वाराला धडक दिली.