Charles Sobhraj : कुख्यात खुनी 'बिकीनी किलर'ची जेलमधून सुटका; पहिला Photo Viral | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Charles Sobhraj

Charles Sobhraj : कुख्यात खुनी 'बिकीनी किलर'ची जेलमधून सुटका; पहिला Photo Viral

जगातील कुख्यात गुंड म्हणून चार्ल्स सोभराज याची ओळख आहे. त्याने ४० ते ४५ महिलांशी बलात्कार करून त्यांचा खून केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तर त्याला आता नेपाळ येथील सेंट्रल जेलमधून सोडण्यात आलं आहे. जेलमधून सुटका झाल्यानंतर त्याचा पहिला फोटो समोर आला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा - जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

चार्ल्स सोभराज हा मागच्या काही वर्षापासून नेपाळ येथील काठमांडू येथील सेंट्रल जेल येथे कैदेत होता. त्याला आता सोडण्यात आलं असून त्याच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी इमिग्रेशन अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले आहे. तर त्यानंतर त्याचा विमानातील एक फोटो व्हायरल झाला आहे.

दरम्यान, विमानात त्याच्या शेजारी बसलेली महिला त्याला पाहून घाबरलेली या फोटोमध्ये दिसत आहे. त्यावर काही नेटकऱ्यांनी मीम्स बनललेले आहेत. कारण चार्ल्स हा बिकीनी घातलेल्या महिलांचे खून करणारा खुनी म्हणून ओळखला जातो, त्याच्यावर 'द सर्पन्ट' नावाची एक सिरीज आली होती आणि त्याच्या शेजारी बसलेली महिला त्याला पाहून घाबरताना दिसत आहे.

टॅग्स :crimenepalviral post