Bilkis Bano Case: आरोपींच्या सुटकेनंतर भीतीने मुस्लिमांनी गाव सोडलं; म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bilkis Bano Case

Bilkis Bano Case: आरोपींच्या सुटकेनंतर भीतीने मुस्लिमांनी गाव सोडलं; म्हणाले...

बिल्किस बानो प्रकरणातील ११ आरोपींना गुजरात सरकारने माफी धोरणांतर्गत मुक्त केलं. त्यावरुन सध्या देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, रंधिकपूर गावातील मुस्लिमांनी आपला जीव वाचवण्यासाठी आपलं गाव सोडलं आहे. तसंच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहित पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. (Bilkis Bano Case)

हेही वाचा: Bilkis Bano: बिल्किस बानो प्रकरणात सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारला बजावली नोटीस

बिल्किस बानो प्रकरणातल्या ११ आरोपींच्या मुक्ततेनंतर रंधिकपूर गावातले मुस्लीम नागरिक गाव सोडून देवगड बारिया इथल्या रहिमाबाद कॉलनीमध्ये स्थलांतरित झाले. रहिमाबाद कॉलनी जमियतने २००२ च्या गुजरात दंगलीतील पीडितांसाठी बांधली होती. स्थलांतरीतांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात या ११ आरोपींना पुन्हा तुरुंगात टाकण्याची मागणी करण्यात आली. तसंच या स्थलांतरितांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. त्यानंतर आपण गावी परतू, असंही या नागरिकांनी सांगितलं आहे.

हेही वाचा: Bilkis Bano Case: बिल्किस बानो प्रकरणात मंजूर केलेल्या माफीला सुप्रीम कोर्टात आव्हान

दहोडच्या जिल्हाधिकाऱ्यांना इथल्या ग्रामस्थांनी पत्र दिलं आहे. या पत्रावर ५५ नागरिकांनी सह्या केल्या आहेत. जोवर या ११ आरोपींना पुन्हा तुरुंगात टाकलं जाणार नाही, तोवर आपण गावात परत येणार नाही, असं या नागरिकांनी सांगितलं आहे. बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार आणि त्यांच्या घरच्यांची गुजरात दंगलीच्या वेळी २००२ साली हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून बिल्किस बानो या कायदेशीर लढाई लढत होत्या.

Web Title: Bilkis Bano Case Muslims Flee Village Say Wont Go Back Till Convicts Jailed Again

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Gujarat