Bilkis Bano: बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची सुटका, काय आहे 'हे' प्रकरण?

गोध्रा येथील कारागृहात हे 11 दोषी शिक्षा भोगत होते
Bilkis Bano
Bilkis Banoesakal

2002 साली गुजरात दंगलीमधील बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या 11 दोषींची सुटका करण्यात आली. गोध्रा येथील कारागृहात हे 11 दोषी शिक्षा भोगत होते. जन्मठेपेची शिक्षा माफ व्हावी असा अर्ज या दोषींनी केला होता. गुन्हेगारांचे वय, गुन्ह्याचे स्वरुप, तुरुंगातील त्यांची वागणूक या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यांची सुटका करण्यात आली आहे.

या दोषींच्या सुटकेबद्दल एक समिती स्थापन करण्यात आली. समितीने दिलेल्या निर्णयानुसार कार्यवाही करण्यात आली. यामध्ये 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने 2002च्या गुजरात दंगलीतल्या बिल्किस बानो प्रकरणात त्यांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई, सरकारी नोकरी आणि घर देण्याचे आदेश सरकारला दिले गेले होते.

"कोर्टानं न्याय दिला. मी समाधानी आहे. सर्वोच्च न्यायालयानं माझ्या वेदना, माझं दुःख आणि माझा लढा समजून घेतला आणि मला न्याय दिला," तब्बल 17 वर्षं न्यायासाठी लढा देणाऱ्या बिल्कीस बानो यांनी ही प्रतिक्रिया दिली होती.

Bilkis Bano
बिल्किस बानो बलात्कार प्रकरण: दोषी तुरुंगाबाहेर; 'या' धोरणानुसार झाली सुटका

बिल्किस बानो प्रकरण

2002 साली उसळलेल्या गुजरात दंगलीतल्या सर्वांत भयंकर घटनेपैकी एक म्हणजे बिल्किस बानो यांचं प्रकरण. या दंगलीमुळे बिल्किस बानो याचं आयुष्यच बदलून गेल. या दंगलीमध्ये पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या 18-19 वर्षांच्या बिल्किस बानोवर यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

बिल्किस बानोवर यांच्या तीन वर्षांच्या चिमूरडीला तिच्या डोळ्यांदेखत जमिनीवर आपटून तिची हत्या करण्यात आली. बिल्किस बानो यांची आई, दोन दिवसांचीच बाळांतीण असलेली बहिण यांच्यासह तिच्या 14 नातलगांचा संतप्त जमावाने जीव घेतला.

या घटनेने बिल्किस आणि तिचे पती याकून दोघांचही आयुष्य बदलून गेलं. गेली 17 वर्षं जीवाच्या भीतीने त्यांना वणवण भटकावं लागलं. ओळख लपवून रहावं लागलं. वीसहून जास्त घरं बदलावी लागली. एकप्रकारे भटक्या स्वरूपाच जगण त्यांच्या नशिबी आलं.

हल्ला करणारे हे सर्वजण गावातलेच होते. याच लोकांसमोर बिल्कीस लहानाची मोठी झाली होती. याच लोकांनी बिल्किस यांचे कपडे फाडले. बिल्किस यांनी गर्भवती असल्याचंही सांगितलं, गयावया केली. मात्र जमाव भडकला होता. त्यांनी बिल्किस यांच्यावर सामूहिक बलात्कार केला.

बिल्किस यांची बहीण दोन दिवसांची बाळांतीण होती. तिच्यावरही बलात्कार करण्यात आला आणि तिच्या नवजात बाळाचीही हत्या करण्यात आली. बिल्किस बेशुद्ध पडल्याने त्या मेल्या आहेत, असं समजून संतप्त जमाव तिथून निघून गेला त्यामुळं बिल्कीस वाचल्या.

बिल्किस यांचा न्यायालयीन लढा

3 मार्च 2002 - बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला, दोन वर्षांच्या मुलीसह 14 नातेवाईकांची हत्या करण्यात आली.

4 मार्च 2002 - बिल्किस बानो यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.

2002 - अहमदाबाद न्यायालयात खटला सुरू झाला

ऑगस्ट 2004 - साक्षीदारांना धमकावणे आणि पुराव्यांशी छेडछाड होण्याच्या शक्यतने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या मदतीने खटला मुंबईत वर्ग केला.

21 जानेवारी 2008 - यावेळी विशेष न्यायालयाने 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर डॉक्टर आणि पोलिसांसह 7 जणांची मुक्तताही केली.

4 मे 2017 - मुंबई उच्च न्यायालयाने 7 जणांना दोषी ठरवलं. यात 5 पोलीस आणि 2 डॉक्टरांचा समावेश होता. पुराव्यांशी छेडछाड आणि कर्तव्यात कसूर केल्याच्या आरोपात दोषी सिद्ध.

10 जुलै 2017 - दोषी सिद्ध झालेल्यांपैकी आयपीएस अधिकारी आर. एस. भगोरा याच्यासह 4 पोलीस आणि 2 डॉक्टरांनी उच्च न्यायालयात दाखल केलेली फेरविचार याचिका 'स्पष्ट पुरावे' असल्याचे म्हणत न्यायालयाने ती फेटाळली.

2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने 2002च्या गुजरात दंगलीतल्या बिल्किस बानो प्रकरणात त्यांना 50 लाख रुपये नुकसान भरपाई, सरकारी नोकरी आणि घर देण्याचे आदेश सरकारला दिले होते.

आणि आता बिल्किस बानो बलात्कार प्रकरणातील 11 दोषींची सुटका करण्यात आली आहे. गुजरात सरकारच्या माफी धोरणानुसार ही सुटका झाल्याचे सांगण्यात येत आहे.

2002 साली गुजरात दंगलीत एक हजारांहून अधिक लोक मारले गेले होते. यात बहुतांश मुस्लीम होते. गोध्रामध्ये साबरमती एक्स्प्रेसला लागलेल्या आगीत 60 हिंदू भाविकांचा मृत्यू झाला होता. मुस्लीम समाजातल्या लोकांनीच आग लावल्याचा आरोप करत हिंदू जमावाने गुजरातच्या अनेक शहरात मुस्लिमांना लक्ष्य करायला सुरुवात केली आणि दंगल उसळली. जवळजवळ तीन दिवस ही दंगल सुरू होती.

सुटका झालेल्या दोषींची नावे

बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणात एकूण ११ जण जन्मठेपेची शिक्षा भोगत होते. यातील सर्व म्हणजेच जसवंत नई, गोविंद नई, शैलेश भट्ट, राध्येशम शाह, बिपिन चंद्र जोशी, केसरभाई वोहनिया, प्रदीप मोरधिया, बकाभाई वोहनिया, राजूभाई सोनी, मितेश भट्ट आणि रमेश चंदना या दोषींची सुटका करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com