esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

बिल गेट्स यांनी केलं मोदींचं अभिनंदन; म्हणाले, "तुम्ही..."

बिल गेट्स यांनी केलं मोदींचं अभिनंदन; म्हणाले, "तुम्ही..."

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आयुष्मान भारत डिजिटल योजनेला सोमवारी (ता.२७ ) प्रारंभ झाला. भारत सरकारच्या वतीने सुरु केलेल्या या योजनेसाठी मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’चे बिल गेट्स यांनी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले आहे. या योजनेसंदर्भातील माहिती देणाऱ्या बातमीची लिंक गेट्स यांनी ट्विटरवर शेअर ‘आयुष्मान भारत डिजिटल योजना राष्ट्रीय स्तरावर सुरु केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. या डिजिटल माध्यमातून मूलभूत सेवेमुळे आरोग्यसुविधा सर्वांना समान पद्धतीने उपलपब्ध होतील. भारताला आरोग्य क्षेत्रातील ध्येय गाठण्यासाठी याचा फायदा होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री डिजिटल आरोग्य मिशन (PM-DHM) योजनेचा शुभारंभ झाला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचा शुभारंभ केला. यावेळी आरोग्यमंत्रीही उपस्थित होते. डिजिटल आरोग्य अभियानाच्या प्रायोगिक प्रकल्पाची घोषणा पंतप्रधानांनी 15 ऑगस्ट, 2020 रोजी लाल किल्ल्यावरुन केली होती. सध्या, सहा केंद्रशासित प्रदेशांमध्ये पीएम-डीएचएम प्रायोगिक टप्प्यात सुरु होणार आहे. पीएम-डीएचएम डेटा, माहिती आणि पायाभूत सेवांच्या विस्तृत श्रेणीच्या माध्यमातून सुलभ, सर्वसमावेशक, कार्यक्षम, परवडणारे आणि सुरक्षित पद्धतीने आरोग्य सुविधा प्रदान करेल.

loading image
go to top