esakal | राकेश झुनझुनवालांची मोठी घोषणा; माफक दारातील विमान कंपनी करणार सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

Rakesh JhunJhunwala

राकेश झुनझुनवालांची मोठी घोषणा; माफक दारातील विमान कंपनी करणार सुरु

sakal_logo
By
अमित उजागरे

नवी दिल्ली : देशातील हुशार गुंतवणूकदार म्हणून ओळख असलेले राकेश झुनझुनवाला हे आता देशाच्या नागरी हवाई क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत. लोकॉस्ट एअरलाईन अर्थात स्वस्तातील सेवा देणारी विमान कंपनी सुरु करण्याचा त्यांचा मानस आहे. ब्लुमबर्ग टीव्हीवरील एका मुलाखतीत त्यांनी याची घोषणा केली. (Billionaire Rakesh Jhunjhunwala to start new airline aau85)

येत्या चार वर्षात नवी एअरलाईन कंपनी सुरु करण्याचा ६१ वर्षीय झुनझुनवाला यांची योजना आहे. त्यांच्या या कंपनीत ७० विमानांचा ताफा असेल. राकेश झुनझुनवाला हे भारतीय हवाई क्षेत्राबद्दल प्रचंड आशावादी असून भविष्यात लोक हवाई मार्गाचा मोठ्या प्रमाणावर वापर करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

राकेश झुनझुनवाला या नव्या विमान कंपनीसाठी ३५ मिलियन डॉलरची गुंतवणूक करण्याचा विचारात आहेत. तसेच या कंपनीचे ४० टक्के समभाग स्वतःजवळ ठेवणार आहेत. पुढील पंधरा दिवसात कंपनीसाठी देशाच्या नागरी हवाई उड्डाण मंत्रालयाकडून नव्या विमान कंपनीसाठी नोऑब्जेक्शन प्रमाणपत्र मिळेल अशी आशाही त्यांनी मुलाखतीत व्यक्त केली आहे.

स्वस्तात विमान प्रवास करता येणार

राकेश झुनझुनवाला म्हणाले, "अत्यंत स्वस्तातील विमान प्रवास देणाऱ्या या कंपनीचं नाव Akasa Air असं असेल. यामध्ये डेल्टा एअरलाईन्स आयएनसी या कंपनीतील माजी वरिष्ठ एक्झिक्युटिव्ह या टीमचा भाग असतील. १८० प्रवासी क्षमतेची विमान त्यासाठी शोधली जात आहेत. हवाई क्षेत्रात उतरण्याचा झुनझुनवाला यांचं धाडसी पाऊल असून त्यांना भारतातील वॉरेन बफेट म्हणून ओळखलं जातं. मागणीचा विचार करता भारतातील हवाई क्षेत्राला मोठा वाव असल्याचंही झुनझुनवाला यांनी म्हटलंय.

loading image
go to top