
बीरभूम हिंसाचारानंतर राज्यातील परिस्थिती तणावपूर्ण बनलीय.
'भाजपच्या कट्टर समर्थकांनी मतदानाला बाहेर पडू नये, नाहीतर..'
कोलकाता : पश्चिम बंगालमधील (West Bengal) बीरभूम हत्याकांडप्रकरणी (Birbhum Violence Case) सीबीआयनं (CBI) 22 आरोपींच्या विरोधात एफआयआर नोंदविलाय. गेल्या मंगळवारी बोगतुई या गावी सहा महिला व दोन मुलांना काहीजणांनी मारहाण केली व जिवंत जाळलं होतं. या प्रकरणी राज्य पोलिसांनी 20 जणांना या आधीच अटक केली होती. आता पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा राजकीय हिंसाचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत.
बीरभूम हिंसाचारामुळं तिथल्या राजकारणातील वादग्रस्त विधानानं आणखीच भर पडलीय. पश्चिम वर्धमान जिल्ह्यातील पांडवेश्वरमधील तृणमूलचे आमदार नरेंद्रनाथ चक्रवर्ती (Narendranath Chakraborty) यांनी कामगार परिषदेत भाजप (BJP) समर्थकांना उघडपणे धमकी दिलीय. लौदोहा गटातील कार्यकर्त्यांसोबतच्या बैठकीत आमदारांनी भाजपच्या कट्टर मतदारांनी बाहेर पडू नये, असा धमकी वजा इशारा दिलाय. जे कट्टर भाजप समर्थक आहेत, त्यांना मतदानाला जाऊ नका असं सांगितलंय, तर लोक मतदानाला गेले नाहीत तर आम्ही मतदान करू, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.
हेही वाचा: बंगाल विधानसभेत भाजप-टीएमसी आमदारांत जोरदार राडा
याबाबत आसनसोलचे माजी महापौर आणि भाजप नेते जितेंद्र तिवारी (Jitendra Tiwari) म्हणाले, तृणमूलच्या आमदारांना समजलंय की भाजपच्या लोकांनी मतदान केलं तर त्यांचा पराभव निश्चित आहे. त्यामुळंच ते धमकी देत आहेत. पण, अशा धमक्यांना आम्ही भाजपवाले घाबरत नाही, असं प्रत्युत्तर भाजपनं टीएमसीला दिलंय. बीरभूम हिंसाचारानंतर राज्यातील परिस्थिती तणावपूर्ण बनलीय. काल याच मुद्द्यावरून विधानसभेत आमदारांमध्ये बाचाबाची झाली. या घटनेनंतर भाजपच्या पाच आमदारांना निलंबित करण्यात आलं. मात्र, सभापतींनी एकतर्फी कारवाई केली असून त्यास विरोध करणार असल्याचा आरोप भाजपनं केलाय.
Web Title: Birbhum Violence Case Tmc Warning Bjp Vote Narendranath Chakraborty
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..