
रांचीः थोर स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांचे पणतू मंगल मुंडांचे (वय ४५) शुक्रवारी उपचारादरम्यान येथील रुग्णालयात निधन झाले. मंगल हे काही दिवसांपूर्वी रस्ते अपघातात गंभीर जखमी झाले होते. मंगल यांची ह्रदयक्रिया बंद पडल्याने आज त्यांची प्राणज्योत मालवल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले.