Atal Bihari Vajpayee : अटलबिहारी वाजपेयींची अनोखी लव स्टोरी, आयुष्यभर राहले अविवाहित

अटलजींची राजकीय कारकीर्द जितकी चर्चेत होती तिकतीच त्यांची पर्नसल लाईफही चर्चेचा विषय होती.
Atal Bihari Vajpayee
Atal Bihari Vajpayeeesakal

Atal Bihari Vajpayee : आज स्वर्गीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज पुण्यतिथी आहे. अटलजी एक उत्तम आणि उमदं व्यक्तीमत्त्व होतं. अटलजींची राजकीय कारकीर्द जितकी चर्चेत होती तिकतीच त्यांची पर्नसल लाईफही चर्चेचा विषय होती. आज आपण त्यांच्या अनोख्या लव्हस्टोरी विषयीच जाणून घेणार आहोत.

40 च्या दशकातील ही लव्हस्टोरी. अटल बिहारी वाजपेयी आणि राजकुमारी हकसर हे ग्वालियरमध्ये विक्टोरिया कॉलेज (आताचं लक्ष्मीबाई कॉलेज) मध्ये  शिकायचे. दोघांमध्ये खूप छान मैत्री होती आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. दोघांनीही कधी प्रेम व्यक्त केले नाही पण अखेर एकेदिवशी अटलजींनी हिम्मत दाखवत राजकुमारींना लव्हलेटर लिहले पण त्यांच्या लवलेटरवर उत्तर आलं नाही. पण त्यांना काय माहिती होतं की हे लव्हलेटर दीड दशकानंतर त्यांचं आयुष्यचं बदलून टाकणार.

असं म्हणतात की अटलजींनी जे लवलेटर लिहलं होतं ते एका पुस्तकात ठेवून त्यांनी वाचनालयात ठेवले होते. त्याच पुस्तकात राजकुमारी कौल यांनी लवलेटरवर उत्तर लिहलं होतं पण अटलजींपर्यंत ते पोहचलं नाही.

Atal Bihari Vajpayee
Atal Bihari Vajpayee Biopic: 'मनात थोडीशी भीती..पण मै अटल हूं..', पंकज त्रिपाठीच्या पोस्टनं वेधलं लक्ष

राजकुमारींची अटलजींसोबत लग्न करण्याची इच्छा होती. मात्र त्यांच्या घरुन या लग्नाला नकार होता. कौलच्या साखरपुड्यासाठी जेव्हा ग्वालियर कुटूंब दिल्लीला आलं त्या दरम्यान 1947 च्या फाळणीमुळे देशात दंगे सुरू होते.

भारत फाळणीदरम्यान राजकुमारींनी काश्मीरी पंडित वडील गोविंद नारायण हकसर यांनी त्यांचा विवाह काश्मीरी पंडित बृज नारायण कौल यांच्याशी केला. राजकुमारी कौलचे पती बीएन कौल रामजस कॉलेज मध्ये प्रोफेसर होते आणि त्यानंतर रामजस हॉस्टेलमध्ये ते वॉर्डन बनले.

Atal Bihari Vajpayee
Atal Pension Yojana: ‘या’ सरकारी योजनेतून मिळणार महिन्याला 5 हजार; वाचा कोणाला होणार फायदा?

हा काळ होता जेव्हा अटलजी राजकारणात सक्रीय होते. लग्नानंतर राजकुमारी कौलचं कुटूंब दिल्ली यूनिवर्सिटीच्या रामजस कॉलेज कॅम्‍पसमध्ये रहायचं. काही वर्षानंतर अविवाहित वाजपेयींनी स्वत:ला राजकारणात पुर्णत: झोकून दिले.  अनेक वर्षानंतर दिल्लीमध्ये वाजपेयींची राजकुमारी कौल यांच्याशी भेट झाली. त्यावेळी राजकुमारी कौल, बीएन कौल यांच्या पत्नी होत्या.

 60 च्या दशकातील गोष्ट आहे जेव्हा अटलजी प्रोफेसर कौल यांच्या घरी सतत यायचे. हॉस्टेलचे विद्यार्थी जेव्हा वार्डनच्या घरी यायचे तेव्हा ते अटलजींनी तिथे बघायचे. अटलजी विद्यार्थ्यांशी खूप बोलायचे. एक वेळ अशी आली की कौल कुटूंब अटलजींच्या लुटीयंस जोनच्या बंगल्यात राहायला आले.

Atal Bihari Vajpayee
Atal Biopic: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींवर 'बायोपिक'

राजकुमारी कौलनी एका इंटरव्यूमध्ये सांगितले की मला आणि अटलजींना कधीच आमच्या नात्याविषयी स्पष्टिकरण देण्याची गरज भासली नाही. अटलजींसोबतच्या नात्याला घेऊन मला कधीच नवऱ्याला सुद्धा स्पष्टीकरण देण्याची गरज पडली नाही.

1968 मध्ये दीन दयाल उपाध्याय यांच्या अचानक निधनानंतर जनसंघाचे अध्यक्ष पदासाठी अटलजींचं नाव समोर आलं. त्यावेळी पार्टीत त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले  बलराज मधोक यांनी अटलजींच्या अनैतिक जीवनशैलीवर आरोप लावले. त्यांचा इशारा थेट राजकुमारी कौलशी असलेल्या नात्यावर होता. पण त्यांच्या आरोपाने काहीही फरक पडला नाही.

Atal Bihari Vajpayee
Atal Bihari Vajpayee Biopic: 'मनात थोडीशी भीती..पण मै अटल हूं..', पंकज त्रिपाठीच्या पोस्टनं वेधलं लक्ष

मिसेज कौलला नेहमी अटलजींच्या घरचा सदस्य मानले गेले. त्यांच्या मृत्यूनंतर ओबिचूअरी लिहिताना अटलजींच्या दत्तक मुलीची आई असा उल्लेख कौल यांनी केला होता. कौल जेव्हा अटलजी सोबत रहायला लागल्या तेव्हा त्यांनी कौलच्या दोन्ही मुलींना दत्तक घेतले होते.

अटलजींची ही एक अशी प्रेमकहाणी होती जी आजही चर्चेत असते. कौलसाठी ते आयुष्यभर अविवाहीत राहले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com