
पतीने पत्नीसह त्याच्या सासूची हत्या केल्याच्या घटनेनं दिल्लीत खळबळ उडालीय. दिल्लीच्या रोहिणी सेक्टर १७ मध्ये मायलेकींची हत्या करण्यात आलीय. नातवाच्या वाढदिवसासाठी आजी गेली होती. तेव्हा गिफ्टवरून पती-पत्नींमध्ये वाद झाला. यानंतर जावयाने त्याच्या पत्नीसह सासूला संपवलं. योगेश सेहगल असं हत्या करणाऱ्या जावयाचं नाव आहे. तर पत्नी प्रिया सेहगल आणि सासू कुसुम सिन्हा अशी हत्या झालेल्या दोघींची नावं आहेत.