कर्नाटकात पुन्हा 'कमळ'; येडियुरप्पा नवे मुख्यमंत्री

टीम ई-सकाळ
Friday, 26 July 2019

कर्नाटकात कुमारस्वामी सरकारविरोधात विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर राज्यात पुन्हा भाजपचे 'कमळ' फुलले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष  बी. एस. येडियुरप्पा यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा आज (शुक्रवार) पार पडला. राज्यपाल वजूभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. 

बंगळुरु : कर्नाटकात कुमारस्वामी सरकारविरोधात विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर राज्यात पुन्हा भाजपचे 'कमळ' फुलले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष  बी. एस. येडियुरप्पा यांच्या सरकारचा शपथविधी सोहळा आज (शुक्रवार) पार पडला. राज्यपाल वजूभाई वाला यांनी येडियुरप्पा यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. 

कर्नाटक विधानसभेत चार दिवसांपूर्वी विश्वासदर्शक ठराव घेण्यात आला. या ठरावादरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करण्यात अपयश आले होते. विश्वासदर्शक ठरावावेळी मतदान घेण्यात आले होते. या मतदानादरम्यान 99 मतं सरकारच्या बाजूने तर 105 मतं सरकारविरोधात गेल्याने विश्वासदर्शक ठराव जिंकण्यात कुमारस्वामी यांना अपयश आले होते. त्यानंतर कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. 

दरम्यान, कर्नाटकात 'ऑपरेशन लोटस' यशस्वी करण्यासाठी भाजपकडून गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरु करण्यात आले होते. त्यानंतर आज या 'ऑपरेशन'ला खऱ्या अर्थाने यश आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP again in Karnataka Yeddyurappa new chief minister