
नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी, गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यासह भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी रेशीमबाग येथील स्मृती मंदिरात हजेरी लावली. यावेळी फडणवीस आणि शिंदेंसह सर्वच आमदारांनी हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. यानंतर सभागृहात सर्व आमदारांची बैठक झाली.