Vidhan Sabha 2019 : बघताय काय रागानं? TikTok स्टारला तिकीट दिलंय भाजपनं!

Sonali-Phogat-TikTok
Sonali-Phogat-TikTok

चंदीगड : प्रसिद्धीसाठी काहीपण करणाऱ्या लोकं सतत काहीना काही करत असतात. अन् सोशल मीडिया हे एक असं विश्व आहे की, इथं अनेकांना आपलं हे टॅलेंट वापरायची संधी मिळते. अपना टाईम आयेगा म्हणत प्रत्येकजण आपापलं नशीब आजमवत असतात. मात्र, कधी कुणाचं नशीब चमकेल हे सांगता येत नाही. अशीच घटना हरयाणामध्ये घडली आहे. सोशल मीडियामधील एका टिक-टॉक स्टारला थेट विधानसभेचं तिकीट मिळालं आहे.   

हरयाणाच्या आदमपूर येथील सोनाली फोगट या टिक-टॉक स्टारला भारतीय जनता पक्षाने विधानसभेच्या आखाड्यात उतरवलं आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचा मुलगा कुलदीप बिश्नोई यांच्या विरोधात भाजपने फोगट यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले आहे. 

यामुळे आनंदित झालेल्या सोनाली फोगट यांनी विजयी होणारच असा विश्वास व्यक्त केला आहे. मला टिक-टॉकवर फॉलो करणारे सगळे फॉलोअर्स माझ्या पाठिशी आहेत. मी लवकरच उमेदवारीचा अर्ज भरणार असून पक्षाचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे मी नक्कीच विजयी होईऩ, असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

सोनाली फोगट ज्यांच्याविरोधात मैदानात उतरणार आहेत, त्या कुलदीप बिश्नोई यांनी या मतदारसंघातून तीनवेळा आमदार होण्याचा पराक्रम केला आहे. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या फरकाने विजय मिळविला होता. 

आदमपूर मतदारसंघाची पार्श्वभूमी...

हरयाणाचे मुख्यमंत्री म्हणून भजनलाल बिश्नोई यांनी तीनवेळा हे पद भूषवले आहे. आदमपूर हा मतदारसंघ हिसार जिल्ह्यात येतो. या मतदारसंघात बिश्नोई कुटुंबाला आतापर्यंत पराभव पत्करावा लागला नाही, त्यामुळे बिश्नोईंसाठी हा बालेकिल्ला ठरला आहे. तर टिक-टॉकवर स्टार असलेल्या सोनाली फोगट यांचे एक लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. त्यांनी याआधी काही मालिकांमध्येही अभिनय केला आहे. त्या सध्या टिक-टॉकवर दररोज नवनवीन व्हिडिओ अपलोड करत असतात. त्यामुळे निवडणुकीच्यावेळी सोनाली फोगट यांचे फॉलोअर्स त्यांना किती पाठिंबा देतात, हे येणारा काळच ठरवेल. 

21 ऑक्टोबरला हरयाणामधील 90 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. मतदान झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी 24 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.

वाचा आणखी महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com