भाजपने उमेदवारांची नावं जाहीर करताच इच्छुकांचे दिले राजीनामे I Manipur Assembly Election | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

manipur

भाजपने उमेदवारांची नावं जाहीर करताच इच्छुकांचे दिले राजीनामे

देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभेची रणधुमाळी सुरु आहे. सध्या या राज्यातील राजकीय घडोमोडींनी वेग घेतला आहे. दररोज काही ना काही घडामोडींमुळे संपूर्ण देशाचं लक्ष या राज्यांच्या निवडणुकांकडे लागून राहिले आहे. दरम्यान आता मणिपूरमध्ये (Manipur) सत्ताधारी भाजपला (BJP) रविवारी मोठा झटका बसला आहे. विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) सर्व 60 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर करताच अनेक इच्छुकांनी तडकाफडकी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. तसेच काही विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या पुतळ्यासह कार्यालयांची जाळपोळ करत इशारा दिला आहे. त्यामुळे भाजपच्या मुख्यालयाबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी मणिपूरमध्ये भाजपने यावेळी कोणतीही आघाडी न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रविवारी एकाचवेळी सर्व 60 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. ही यादी बाहेर येताच मणिपूरमध्ये अनेक मतदारसंघात रणकंदन सुरू झाले. परिणामी या परिसरात काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, या यादीमध्ये काँग्रेसमधून (Congress) आलेल्या अनेक नेत्यांची नावे आहेत. तसेच काही विद्यमान आमदारांनाही पक्षाने तिकीट नाकारले असल्याने काही ठिकाणाहून संतप्त प्रतिक्रिया आल्या आहेत. (Manipur Election 2022)

हेही वाचा: Budget 2022: राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात

या कारणांमुळे भाजपमधील इच्छूक तसेच अनेक वर्षांपासून पक्षात काम करणारे नेते व पदाधिकाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला आहे. काही इच्छूकांनी राजीनामे दिले असून विद्यमान आमदारही पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलामध्ये काही जणांनी प्रवेश केला आहे. भाजपचे नेते अरूणकुमार, एन रॉबर्ट, के. एच सुरेश, टी. एच. ब्रिंदा यांना तिकीट नाकारल्याने नितीश कुमार यांच्या पक्षात दाखल झाल्याचे सुत्रांनी सांगितले. (Manipur Election Update)

दरम्यान, मणिपूरमध्ये दोन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यात 27 फेब्रुवारी तर दुसऱ्या टप्प्यात तीन मार्च रोजी मतदान होणार आहे. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसचे 28 आमदार निवडून आले होते. पण त्यानंतरही 21 आमदार असलेल्या भाजपने दोन प्रादेशिक पक्षांना सोबत घेत सरकार बनवले होते. पण या निवडणुकीत भाजपने दोन्ही पक्षांना दूर ठेवले आहे.

हेही वाचा: Budget 2022: राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात

Web Title: Bjp Announces List Upcoming Candidate Protest And Resignation In Manipur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top