Budget 2022: राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ram Nath Kovind
Budget 2022 | राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात

Budget 2022: राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात

Budget 2022: राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaram) संसदेत सादर करतील.विचार जुने असले तरी नव्या संसाधनाच्या मदतीने मार्ग काढले जाऊ शकतात, असं राष्ट्रपती म्हणाले.

मी त्या लाखो स्वातंत्र्यसैनिकांना नमन करतो ज्यांनी त्यांच्या कर्तव्याला प्राधान्य दिले आणि भारताला हक्क मिळवून देण्यासाठी मदत केली. स्वातंत्र्याच्या 75 वर्षात भारताच्या विकासाच्या वाटचालीत योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचेही मी आदरपूर्वक स्मरण करतो, असं राष्ट्रपती राम नाथ कोविंद म्हणाले.आझादी का अमृत महोत्सवानिमित्ताने पुढच्या 25 वर्षात सर्वसमावेशक, सर्वहितकारक, आत्मनिर्भर भारतातासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे सांगितले.कोरोनाने अनेक लोकांना आपल्यापासून हिरावून घेतले.या काळात काम करणाऱ्या सर्व फ्रंटलाईन वर्कर आणि नागरिकांचे राष्ट्रपतींनी आभार मानले.

पद्म पुरस्कारात देशभरातील विविध भागातील विविध क्षेत्रातील लोकांना पुरस्कार दिले गेले, हे सरकार सर्वसमावेशक विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे राष्ट्रपतींनी सांगतले. कोरोनाच्या काळात अनेक देशात अन्नधान्याची कमी पाहायला मिळाले. परंतु 80 करोड लाभार्थ्य़ांना फायदा मिळाला. तसेच डिजिटल इंडियातही सरकारने प्रभावी काम केलं. कोरोनातही पेय जल 6 करोड लोकांना फायदा झाला तसेच स्वामित्व योजनेअंतर्गत लोकांना फायदा झाला.

कोणीही उपाशीपोटी घरी परतणार नाही याची खात्री करण्यासाठी, माझे सरकार दर महिन्याला पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा भाग म्हणून गरिबांना मोफत रेशनचे वाटप करते. आज भारत जगातील सर्वात मोठा अन्न वितरण कार्यक्रम चालवत आहे; ती मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे, असं राष्ट्रपती राम नाथ कोविंद म्हणाले.

कोरोना काळातही देशाची निर्यात वाढली आहे. देश इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात पुढे जावा म्हणून सरकारने 76 हजार करोडचं पॅकेज घोषित केलं आहे. सरकार पारंपारिक उद्योगांनासुद्धा प्रोत्साहन देत आहे. त्यातूनच मेगाटेक्सटाईल हब सुरु केले जात आहेत. लघू, सुक्ष्म उद्योगांना चालना देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत महत्त्वाचं काळात खादीउद्योगांनं महत्त्वाची भूमिका बजावली. 2014 नंतरच्या काळात खादी विक्रीत वाढ झाली आहे. रेल्वेचेही आधुनिकीकरण तसेच रेल्वे डब्यांचे आधुनिकीकरण चालू आहे. रेेल्वेचं विद्युतीकरणही चालू आहे. सागरमाला योजनेअंतर्गतही जलमार्गांच काम चालू आहे. त्यासाठी सरकारकडून काम चालू आहे.

देशातील रोजगार उपलब्धतेसाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे राष्ट्रपती सांगितले. अनेक दशकांपासून दुर्लक्षित भागांमध्ये पायाभूत सुविधांचे काम जोरात चालले आहे. त्याचा फायदा अनेक खेड्यांना होतोय. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय महामार्ग तसेच एक्सप्रेस वे इत्यादींचं काम वेगाने चालू आहे. तसेच देशात 21 ग्रीनफिल्ड एअरपोर्टला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच 24 राज्यात 111 जलमार्ग घोषित केले आहेत.देशातील 8 राज्यात 11 नवे राष्ट्रीय मार्ग घोषीत केले आहेत.

कोणीही उपाशीपोटी घरी परतणार नाही याची खात्री करण्यासाठी, माझे सरकार दर महिन्याला पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचा भाग म्हणून गरिबांना मोफत रेशनचे वाटप करते. आज भारत जगातील सर्वात मोठा अन्न वितरण कार्यक्रम चालवत आहे; ती मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे, असं राष्ट्रपती राम नाथ कोविंद म्हणाले.

सरकार संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी भारताच्या संस्था काम करत आहेत. तेजस फायटर जेट हा त्याचाच भाग असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितले. सर्व 33 सैनिक शाळांनी आता मुलींनाही प्रवेश देण्यास सुरुवात केली आहे ही आनंदाची बाब आहे. नॅशनल डिफेन्स अकादमी (NDA) मध्ये महिला कॅडेट्सच्या प्रवेशालाही सरकारने मान्यता दिली आहे. महिला कॅडेट्सची पहिली तुकडी जून 2022 मध्ये NDA मध्ये येईल, असं राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात सांगितले.

Web Title: The Budget Session Begins With The Presidents Address

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top