
Rahul Gandhi
Sakal
नवी दिल्ली: ‘‘लडाखचे लोक, तेथील संस्कृती आणि परंपरांवर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हल्ला केला आहे,’’ असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रविवारी समाज माध्यमातून केला. ‘लडाखला राज्याचा दर्जा बहाल करावा; सहावी अनुसूची लागू करावी, यांसह अन्य मागण्यांसाठी लडाखमध्ये मागील काही काळापासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाने हिंसक वळण घेतल्यानंतर त्यात चार युवकांचा मृत्यू झाला होता तर ७० पेक्षा अधिक जण जखमी झाले होते.