Shashi Tharoor : "राहुल गांधींचं 'भारत जोडो' सुरु तर काँग्रेसचे भावी अध्यक्ष 'भारत तोडो'च्या तयारीत" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi_Shashi Tharoor

Shashi Tharoor: "राहुल गांधींचं 'भारत जोडो' सुरु तर काँग्रेसचे भावी अध्यक्ष 'भारत तोडो'च्या तयारीत"

नवी दिल्ली : काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेले शशी थरुर यांनी पक्षामधील सुधारणेचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. मात्र, या जाहीनाम्यात भारताचा चुकीचा नकाशा प्रसिद्ध करत त्यांनी मोठी चूक केली, त्यामुळं त्यांना मोठ्या टीकेला समोरं जावं लागलं. यावरुन आता भाजपनंही त्यांच्यावर निशाणा साधला. (BJP attacks Shashi Tharoor after his Congress chief poll manifesto shows wrong map of India)

भाजपच्या आयटीसेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी या संदर्भात ट्विट केलंय. यामध्ये ते म्हणतात, "काँग्रेसच्या अध्यक्षपदाचे इच्छुक शशी थरूर यांनी आपल्या जाहीरनाम्यात भारताचा विकृत नकाशा टाकला आहे. राहुल गांधी 'भारत जोडो' यात्रेवर असताना, काँग्रेसचे भावी अध्यक्ष भारताचे तुकडे करण्याच्या तयारीत आहेत. कदाचित त्यांना असं वाटतं असावं की, यामुळं आपल्याला गांधींशी अनुकूलता मिळवण्यास मदत होईल"

हेही वाचा: Sharjeel Imam : जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमामला जामीन मंजूर; पण रहावं लागणार तुरुंगातच!

दरम्यान, भाजपच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले, "भारत जोडो यात्रा कर्नाटकात दाखल झाल्यामुळं भाजप आता पूर्णपणे घाबरली आहे. त्यामुळं काँग्रेसला लक्ष्य करण्यासाठी आता भाजपचा 'आय ट्रोल सेल' (आयटी सेल) कोणतेही क्षुल्लक कारण शोधेल. भारत जोडो यात्रा आणि राहुल गांधी यांना कलंकित करा हेच त्याचं ध्येय आहे"

हेही वाचा: Shashi Tharoor: थरूर यांच्या जाहिरनाम्यात घोर चूक; भाजपच्या टीकेनंतर केली सुधारणा

काँग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार असलेल्या शशी थरूर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तसेच काँग्रेसमधील सुधारणांचा जाहीरनामाही प्रसिद्ध केला. पण यामध्ये दाखवलेल्या भारताच्या नाकाशात जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखचा काही भाग वगळलेला दाखवण्यात आला. या गंभीर चुकीमुळं खळबळ माजल्यानंतर शशी थरूर यांच्या कार्यालयानं या जाहीरनाम्यात तातडीनं सुधारणा केल्या.