Sharjeel Imam : जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमामला जामीन मंजूर; पण रहावं लागणार तुरुंगातच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sharjeel Imam, JNU Student Accused Of Sedition, Arrested In Bihar

Sharjeel Imam : जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमामला जामीन मंजूर; पण रहावं लागणार तुरुंगातच!

नवी दिल्ली : जेएनयूचा विद्यार्थी शरजील इमाम याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, गया आणि असनसोल येथील अलिगढ मुस्लिम विद्यापीठात त्यानं केलेल्या भाषणासंबंधीच्या खटल्यात त्याला जामीन मंजूर झाला आहे.

हेही वाचा: Ajit Pawar : पहिले उद्धव ठाकरे अन् मग एकनाथराव; अजित पवारांचं हटके उत्तर

या ठिकाणी सन २०१९ नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि NRC विरोधातील आंदोलनादरम्यान शरजील इमामनं सरकारविरोधात भडकाऊ भाषण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. शरजीलचं भाषण द्वेषाला खतपाणी घालणार असून यामुळं जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात दंगल भडकल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे.

हेही वाचा: Shivsena: सेनेची चाल, राठोडांना धक्का; सुनील महाराजांच्या हाती शिवबंधन

शरजील हा जानेवारी २०२० पासून न्यायालयीन कोठडीत असून दिल्लीच्या स्थानिक कोर्टानं त्याला वैयक्तिक ३०,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. शरजीलला या प्रकरणात जामीन मिळाला असला तरी त्याची अद्याप तुरुंगात सुटका होणार नाही. कारण त्याच्याविरोधात अनेक खटले दाखल असून अद्याप ते प्रलंबित आहेत.

हेही वाचा: Eknath Shinde: शिंदे सेनेच्या मेळाव्याच्या टीझरमध्ये नेमका ‘तो’ शब्द राहिला; शिवसेनेने साधली संधी

सुप्रीम कोर्टानं राजद्रोहाच्या खटल्यांवरील सुनावणींना स्थगिती दिल्यानंतर शरजीलनं दिल्लीच्या साकेत जिल्हा न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.

टॅग्स :JnuDesh newsCAA