राहुल गांधीच्या ट्विटर हॅकिंगमागे भाजप: कॉंग्रेस

वृत्तसंस्था
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

नवी दिल्ली - कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यामागे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.

नवी दिल्ली - कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यामागे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.

कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले होते. या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांनी ट्विटरद्वारे म्हटले यांनी "जे लोक देशातील नागरिकांनी एका रात्रीत ऑनलाईन पेमेंट पद्धती स्वीकारावी असे म्हणत आहेत त्यांनी सामान्य लोकांचे खाते हॅकिंगपासून सुरक्षित ठेवण्याची काही पावले उचलली आहेत का?' असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. राहुल गांधी यांचे अकाऊंट पुन्हा पूर्ववत केल्यानंतर गांधी यांनीही ट्विटरद्वारे प्रतिक्रिया व्यक्त करताना माझा द्वेष करणाऱ्यांवरही मी प्रेम करतो, असे म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षासह केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने हॅकिंगचे हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार काळ्या पैशाविरुद्ध कारवाई करून डिजिटलायझेशनच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना हा राजकीय प्रकार दिशाभूल करणारा असल्याचे भाजपने म्हटले आहे. तर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्यात येईल आणि दोषींना शिक्षा करण्यात येईल, असे म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Behind Twitter hacking of Rahul Gandhi