Delhi Assembly Elections : 'म्हणून केजरीवाल घाबरलेत...'; भाजप उमेदवाराचा खुलासा

वृत्तसंस्था
Tuesday, 21 January 2020

दिल्लीतल्या हरिनगरमधून भाजपची उमेदवारी मिळालेले तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करत, भाजप यावेळी 50 हून अधिक जागांवर निवडून येईल असा दावा केलाय.

दिल्ली विधानसभा निवडणूक  नवी दिल्ली : दिल्लीतील विधानसबा निवडणूकांचे वारे वाहात असतानाच भाजपच्या उमेदवाराने दिल्लीत 50हून अधिक जागा निवडून येण्याचा दावा केला आहे. यापूर्वी भाजपला दिल्ली विधानसभेत केवळ चार जागा जिंकता आल्या होत्या. पण भाजप उमेदवारांने केलेल्या या वक्तव्यामुळे आता खरंच ते इतक्या जागा जिंकू शकतात का याकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

भाजपची दुसरी यादी जाहीर; केजरीवालांविरुद्ध यांना उमेदवारी

दिल्लीतल्या हरिनगरमधून भाजपची उमेदवारी मिळालेले तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करत, भाजप यावेळी 50 हून अधिक जागांवर निवडून येईल असा दावा केलाय. एएनआयशी बोलताना त्यांनी सांगितले की, 'भाजप 50 हून अधिक जागांवर निवडून येईल, आणि यामुळेच केजरीवाल आता घाबरले आहे. म्हणूनच 15 दिवसांपूर्वी दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफिसमध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली होती.' त्यांच्या या वक्तव्यामुळे नक्की कोणती कागदपत्रे जळाली, याचाही शोध घेतला जातोय. मात्र दिल्ली विधानसभेत केवळ चार जागा असणाऱ्या भाजपने 50 जागांचा दावा केल्याने यावेळची निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी यादी आज (मंगळवार) जाहीर केली असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून युवा मोर्चाचे अध्यक्ष सुनील यादव यांना उतरविले आहे. दिल्ली विधानसभेच्या प्रचाराला रंग भरू लागला असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले खरे, परंतु वेळेत न पोचल्याने आता आज (मंगळवार) अर्ज भरणार आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP candidate challenges that they can will more than 50 seats in Delhi assembly elections