भाजपची दुसरी यादी जाहीर; केजरीवालांविरुद्ध यांना उमेदवारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bjp

दिल्ली विधानसभेच्या प्रचाराला रंग भरू लागला असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले खरे, परंतु वेळेत न पोचल्याने आता आज (मंगळवार) अर्ज भरणार आहेत. 

भाजपची दुसरी यादी जाहीर; केजरीवालांविरुद्ध यांना उमेदवारी

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी यादी आज (मंगळवार) जाहीर केली असून, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून युवा मोर्चाचे अध्यक्ष सुनील यादव यांना उतरविले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भाजपने यापूर्वी 70 पैकी 57 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. आज त्यांनी 10 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. अद्याप भाजपने तीन उमेदवार घोषित केलेले नाहीत. भाजपने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. शिरोमणी अकाली दल आणि भाजपची युती दिल्ली विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळत नाही. दिल्लीत भाजपसमोर आम आदमी पक्षाचे मोठे आव्हान आहे. बंडखोरी टाळण्यासाठी भाजपने 2015 मध्ये आपटलेल्या 26 उमेदवारांना पुन्हा तिकिटे दिली आहेत. मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण, तसेच खुद्द अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध नवी दिल्लीतून कोण उभे राहणार, हे प्रश्‍न मात्र भाजपने अनुत्तरितच ठेवले आहेत. 

नाकारलेल्यांच्या हाती खोट्याचे शस्त्र; मोदींचे प्रतिपादन

उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यासमोर पटपडगंजमधून रवी नेगी यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तर, केजरीवाल यांच्याविरोधात सुनील यादव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिल्लीत 8 फेब्रुवारीला मतदान व संसद अधिवेशन पूर्वार्धाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे 11 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहेत. 

दिल्ली विधानसभेच्या प्रचाराला रंग भरू लागला असून, उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले खरे, परंतु वेळेत न पोचल्याने आता आज (मंगळवार) अर्ज भरणार आहेत. 

loading image
go to top