'अब्बाजान, चच्चाजानच्या लोकांनी लक्षात ठेवावं...', योगींचा ओवैसींना इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'अब्बाजान, चच्चाजानच्या लोकांनी लक्षात ठेवावं...', योगींचा ओवैसींना इशारा

'अब्बाजान, चच्चाजानच्या लोकांनी लक्षात ठेवावं...', योगींचा ओवैसींना इशारा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कानपूर: उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका आता अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण आता हळू हळू आणखीनच तापत चाललं आहे. यूपीला काबिज करण्याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो. भाजपला आपली सत्ता याठिकाणी टिकवायची आहे. योगी आदित्यनाथ आज कानपूरमध्ये बोलत होते. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कानपूरमध्ये बोलताना एमआयएम आणि पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, समाजवादी पक्षावर देखील टीकास्त्र सोडलं आहे. CAA च्या मुद्द्यावरून असदुद्दीन औवैसी लोकांच्या भावना भडकवत असून ते समाजवादी पक्षाचे एजंट असल्याचा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला आहे.

हेही वाचा: वानखेडेंनी माझ्या मुलाला खोट्या प्रकरणात अडकवलं, निवृत्त ACP चा आरोप

त्यांनी म्हटलंय की, मी त्या व्यक्तीला आव्हान देतो की ज्याने CAA कायद्यावरुन लोकांना भडकवण्याचं काम केलं आहे आणि ते परत एकदा ते काम करत आहेत. जनतेला माहिती आहे की, ओवैसीने समाजवादी पक्षाचा एजंट बनून उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश केला आहे. मी या अब्बाजान आणि चच्चाजानच्या लोकांना सांगू इच्छितो की, जर त्यांनी यावरुन यूपीच्या लोकांना भडकावण्याचा आणि वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला तर राज्य सरकार अशांना कठोरपणे कसं हाताळायचं ते जाणून आहे.

हेही वाचा: झी न्यूज आणि टाइम्स नाऊवर कारवाई; चुकीच्या आणि एकांगी वार्तांकनावर ठपका

मुख्यमंत्री योगींनी म्हटलंय की, कोरोनाला अटकाव घालण्यासाठी भारताने जगापेक्षा सर्वांत चांगली उपाययोजना केली. आतापर्यंत देशात 112 कोटी लोकांना मोफत लस देण्यात आली आहे. इतर पक्षाचे लोक घरी बसले. भाजपासाठी व्यक्ती नाही तर राष्ट्र सर्वांत आधी आहे. जेंव्हा जग कोरोनामुळे अडचणीत होतं तेंव्हा लोकांना वाचवण्यासाठी भाजपचे लोक काम करत होते.

स्वातंत्र्यानंतर मूल्ये, आदर्श आणि भारताप्रती सर्वस्व समर्पित करणारी जर कोणती पार्टी असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे. कोरोना काळात मदतीसाठी भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते पुढे आले. पंतप्रधान मोदी आणि जेपी नड्डा यांच्या प्रेरणेमुळेच हे शक्य झालं, असंही ते म्हणाले.

loading image
go to top