झी न्यूज आणि टाइम्स नाऊवर कारवाई; चुकीच्या आणि एकांगी वार्तांकनावर ठपका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झी न्यूज आणि टाइम्स नाऊवर कारवाई; चुकीच्या आणि एकांगी वार्तांकनावर ठपका

झी न्यूज आणि टाइम्स नाऊवर कारवाई; चुकीच्या आणि एकांगी वार्तांकनावर ठपका

The News Broadcasting and Digital Standards Authority (NBDSA) ने दोन नॅशनल न्यूज चॅनेल्सना फटकारलं आहे. हिंदी भाषिक झी न्यूझ आणि इंग्रजी भाषेतील टाइम्स नाऊने वार्तांकन करताना आचारसंहितेचा भंग केला असल्याचा ठपका NBDSAने ठेवला आहे. शेतकऱ्यांनी 26 जानेवारी रोजी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीचं वार्तांकन करताना झी न्यूजने शेतकरी आंदोलनाला 'खलिस्तानी' ठरवलं होतं. तर दुसरीकडे 2020 सालच्या दिल्ली दंगलींचं वार्तांकन करताना टाइम्स नाऊने दोन कार्यक्रमांमध्ये आचारसंहितेचा भंग केल्याचं आढळून आलं आहे. NBDSA ही भारतातील न्यूज टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर्सशी निगडीत अशी खाजगी आणि स्वयंसेवी संघटना आहे.

हेही वाचा: परबांच्या शासकीय निवासस्थानावर फेकली काळी शाई, ४ जण ताब्यात

शेतकरी आंदोलनाचं वार्तांकन करताना झी न्यूजने 'ताल ठोक के: खलिस्तान से कब सावधान होगा किसान?' आणि 'ताल ठोक के: नही माने किसान तो क्या रिपब्लिक डे पर होगा 'गृह युद्ध?' असे दोन कार्यक्रम केले होते. हे दोन्ही कार्यक्रम अनुक्रमे 19 जानेवारी आणि 20 जानेवारी 2021 रोजी प्रसारित झाले होते. यासंदर्भात NDBSA कडे तक्रार करण्यात आली होती. त्या तक्रारीत असे म्हटलंय की, या कार्यक्रमांद्वारे "प्रेक्षकांमध्ये अवाजवी भीती आणि त्रास निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच लोकांचे संरक्षण करण्यासाठी असलेल्या राष्ट्रीय संस्थांच्या क्षमतेवरील लोकांचा विश्वास कमी करण्यासाठी हे कार्यक्रम नियोजित करण्यात आल्याचंही म्हटलं आहे. या कार्यक्रमांमध्ये वापरल्या गेलेल्या हेडलाईन्स आणि टॅगलाईन्स या थेटपणे वार्तांकनासाठी असलेली आचारसंहिता आणि प्रसारण मानकांचे उल्लंघन करणाऱ्या आहेत.

हेही वाचा: 'दाऊद चॅट्स' बनावट; खोट्या अकाऊंटविरोधात क्रांतीने केली तक्रार

NBSDA ने चॅनेलला याबाबत असलेली आपली नाराजी व्यक्त केली आहे. तसेच झी न्यूजला निर्देश दिले आहेत की, या प्रसारणाचा व्हिडिओ चॅनलच्या वेबसाइटवर, YouTube चॅनेलवर किंवा इतर कोणत्याही लिंकवर उपलब्ध असल्यास, तो ताबडतोब काढून टाकण्यात यावा. तसेच सात दिवसांच्या आत NBDSA ला त्याबाबत लेखी कळवण्यात यावं.

टाइम्स नाऊमधील मुख्य संपादक राहुल शिवशंकर यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांच्या 'इंडिया अपफ्रंट' या शोमधील 14 सप्टेंबरच्या कार्यक्रमाविरुद्ध आक्षेप घेण्यात आला होता. "उमरच्या अटकेबाबत धक्कादायक सत्य दिल्लीला माहीत आहे का? राहुल शिवशंकर यांनी "डाव्या विचारसरणीच्या गुप्त बैठकीबद्दल" वक्तव्य केलं होतं. शिवशंकर यांनी स्पष्टपणे दर्शकांची दिशाभूल करण्याचा आणि समुदायांमध्ये शत्रुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता, असं या तक्रारीत म्हटलंय.

अँकर पद्मजा जोशी यांच्या विरोधात आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यांनीही आचारसंहितेच्या अनेक मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. न्यूजहॉरच्या एपिसोड दरम्यान, “दिल्ली दंगल: पोलिस आणि काफिरांना मारण्याचा कट उघड; शांततापूर्ण निषेधाचा देखावा?" अशा हेडलाईन खाली त्यांनी कार्यक्रम केला होता.

NBDSA ला आढळून आलंय की "या कार्यक्रमांमधील अँकरनी निःपक्षपाती आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने डिबेट्स केलेल्या नाहीयेत. त्यांनी वेळोवेळी आचारसंहिता आणि प्रसारण मानकांचं उल्लंघनच केलं आहे. तसेच NBDSA द्वारे जारी केलेल्या विविध मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केलेल्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन केले आहे.

loading image
go to top