भाजपचं आता MCDच्या महापौरपदासाठी 'मिशन लोटस'; बड्या नेत्याचं सूचक ट्विट अन्...

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal
Updated on

नवी दिल्ली - आम आदमी पक्षाने (आप) एमसीडीच्या निवडणुकीत बहुमताने विजय मिळवला आहे. मात्र महापौरपदाची निवडणूक अद्याप प्रलंबितच आहे. चंदीगढमध्ये विरोधकांकडे सर्वाधिक जागा असूनही महापौर भाजपचाच झाल्याचं सूचक ट्विट भाजपच्या बड्या नेत्याने केलं आहे. त्यामुळे आम आदमी पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. (bjp claims to be its mayor despite defeat in delhi municipal corporation elections )

हेही वाचा- Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का?

Arvind Kejriwal
आजही मुलं चिनी खेळण्यांसोबत खेळतात, मग मेक इन इंडिया..; KCR यांचा मोदींना सवाल

भाजपचे नेते अमित मालवीया यांनी ट्विट करून म्हटलं की, आता दिल्लीच्या महापौरपदाच्या निवडणुकीची वेळ आली आहे. आता काटे की लढत होणार असून यात कोण किती संख्याबळ जमवू शकेल, नगरसेवक कसे मतदान करतात यावर ते अवलंबून असेल. चंदीगडमध्ये भाजपचा महापौर झाला होता, याचं केवळ उदाहरण देत असल्याचंही मालवीया यांनी म्हटलं."

चंदीगड महापालिकेत ३५ प्रभागांमध्ये १४ जागा जिंकून 'आप' सर्वात मोठा पक्ष ठरला होता. परंतु त्यांना महापौरपदासाठी बहुमत मिळाले नाही. दरम्यान दिल्ली शहराचा महापौर पुन्हा आमचाच होईल, असा दावा दिल्ली भाजपचे प्रवक्ते तजिंदर पालसिंग बग्गा यांनी केला आहे.

दरम्यान अमित मालवीया आणि भाजपचे प्रवक्ते तजिंदर यांनी केलेल्या दाव्यामुळे एमसीडीच्या महापौरपदासाठी भाजप मिशन लोटस राबवणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यात आता भाजपला किती यश हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. एमसीडी निवडणुकीत आपला १३४ जागा मिळाल्या. तर भाजपला १०४ जागांवर विजय मिळवता आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com