आजही मुलं चिनी खेळण्यांसोबत खेळतात, मग मेक इन इंडिया..; KCR यांचा मोदींना सवाल

Telangana CM K Chandrasekhar Rao
Telangana CM K Chandrasekhar Raoesakal
Updated on

नवी दिल्ली - आजही देशातील लहान मुलं चिनी बनावटीच्या खेळण्यांशी खेळतात, असे सांगत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी 'मेक इन इंडिया'वरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. एनपीएच्या नावावर सामान्यांकडून आठ वर्षांत १४ लाख कोटी रुपये लुटले. आता वीज विभागाच्या खासगीकरणाची गोष्ट करत असल्याचा आरोप केसीआर यांनी केला. (kcr attack on pm modi )

Telangana CM K Chandrasekhar Rao
'शिवाजी महाराज के सम्मान में मुसलमान मैदान में'! पुण्यातील बंदला मुस्लीम संघटनांचा पाठिंबा

केसीआर पुढं म्हणाले की, विकासाच्या गप्पा होतात पण विकास होत नाही. त्यांना गरीब लोकांचे कल्याण दिसत नाही. अंगणवाड्यांच्या निधीमध्ये कपात करून 'बेटी पढाओ बेटी बचाओ'च्या घोषणा देतात. किती दिवस या फेक घोषणा देणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

केसीआर म्हणाले की, हा देश बदलण्याची गरज आहे. देशात आतापर्यंत दहा हजार उद्योग बंद पडले आहेत. पन्नास लाख नोकऱ्या गेल्या आहेत. दहा हजार गुंतवणूकदार देश सोडून जात आहेत.. पण नवीन काही आलेलं नाही. देशाला काय झाले, याचा विचार तरुणांनी आणि सुशिक्षितांनी करायला हवा.

Telangana CM K Chandrasekhar Rao
Video : दोन्ही राज्यात भाजपचं सरकार, तरीही… ; कर्नाटकप्रश्नी सुप्रिया सुळे लोकसभेत संतापल्या

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी जगतियाल जिल्हाधिकारी कार्यालयाचे उद्घाटन केले आणि जगतियाल मेडिकल कॉलेज इमारतीच्या बांधकामाची पायाभरणी केली. तेलंगणा हे देशातील एकमेव राज्य आहे जे २४ तास विनामूल्य वीज पुरवते. तेलंगणा हे एकमेव सरकार आहे जे राज्यात पिकविलेले संपूर्ण धान्य खरेदी करते. मेहनतीमुळेच तेलंगणाने अव्वल स्थान गाठले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com